Home / देश-विदेश / बांगलादेश बँकेची नवीन नोट! शेख मुजीबुरांचा फोटो हटवला

बांगलादेश बँकेची नवीन नोट! शेख मुजीबुरांचा फोटो हटवला

ढाका- बांगलादेश बँकेने नवीन नोटा जारी केल्या.या नोटांवरून बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान अर्थात शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो हटवण्यात...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA


ढाका- बांगलादेश बँकेने नवीन नोटा जारी केल्या.या नोटांवरून बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान अर्थात शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो हटवण्यात आला. त्याऐवजी बौद्ध,हिंदू मंदिरे,ऐतिहासिक स्मारके आणि कलाकृती यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिमा वापरण्यात आल्या.नवीन चलनी नोटा बांगलादेश बँकेच्या मुख्यालयातून टप्प्याटप्प्याने देशभर पोहोचल्या जाणार आहे.
बांगलादेश बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसेन खान यांनी सांगितले की,नवीन नोटा देशाच्या सांस्कृतिक,ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचे दर्शन घडवतील.यामध्ये मानवी प्रतिमांऐवजी वास्तुशिल्प,निसर्गदृश्ये आणि ऐतिहासिक स्मृतीस्थळे अधिक ठळक असतील. या नोटांमध्ये बौद्ध आणि हिंदू मंदिरांची चित्रे, प्रसिद्ध चित्रकार जैनुल आबेदीन यांची कलाकृती,राष्ट्रीय शहीद स्मारकाचा समावेश करण्यात आला आहे. या डिझाईनचा उद्देश १९७१ च्या मुक्तिसंग्रामातील बलिदानांची आठवण करून देणे हा आहे.

Web Title:
संबंधित बातम्या