Home / देश-विदेश / सर्वांसमक्ष माफी मागा डॉ.कुट्टिकरांचा अल्टिमेटम

सर्वांसमक्ष माफी मागा डॉ.कुट्टिकरांचा अल्टिमेटम

पणजी – गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मागितलेली माफी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार डॉ.रुद्रेश...

By: Team Navakal


पणजी – गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मागितलेली माफी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार डॉ.रुद्रेश कुट्टिकर यांनी अमान्य केली आहे.माफी मागायची असेल तर चोवीस तासांच्या आत रुग्णालयात येऊन सर्वांसमक्ष माफी मागा.अन्यथा रुग्णसेवा बंद केली जाईल,असा अल्टिमेटम डॉ. कुट्टीकर यांनी आरोग्य मंत्र्यांना दिला आहे.
गेल्या आठवड्यात एका रुग्णाला इंजेक्शन न दिल्याच्या कारणावरून मंत्री राणे यांनी डॉ.कुट्टीकर यांचा सर्वांसमक्ष पाणउतारा करत त्यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित केले होते. राणेंचा हा असभ्यपणा व्हिडिओमध्ये कैद झाला. समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होताच राणेंवर टीकेची झोड उठली.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीदेखील या घटनेची गांभीर्याने दखल घेत डॉ. कुट्टीकर यांचे निलंबन रद्द केले. त्यानंतर राणे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे डॉ. कुट्टीकर यांची माफी मागितली. मात्र, त्यांच्या माफीनाम्यानंतरही डॉ.कुट्टीकर आणि त्यांचे सहकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या