Honda ने लाँच केल्या 3 नवीन प्रीमियम बाईक्स, किंमत-फीचर्स जाणून घ्या.

Honda New Bikes | होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) बाजारात CB350, CB350 H’ness आणि CB350RS या बाइक्सचे चे नवीन मॉडेल लाँच केले आहे. रायडिंगचा अनुभव अधिक आनंददायी करण्यासाठी या बाईक्सला नवीन रंगांसह सादर करण्यात आले आहे.

CB350 आणि CB350 H’ness यांमध्ये रेट्रो लुक आणि आधुनिक तंत्रज्ञान देण्यात आले आहे, तर CB350RS ही अधिक स्पोर्टी आणि डायनॅमिक राइडसाठी डिझाइन करण्यात आली आहे. या बाईक्सच्या किंमती 2,10,500 रुपयांपासून पासून 2,18,850 रुपयांपर्यंत आहे.

या सर्व बाईक्समध्ये 348.36cc क्षमतेचं एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर BSVI OBD2B अनुरूप PGM-FI इंजिन देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या इंजिनमध्ये आता E20 इंधनावर चालण्याची क्षमता ही जोडण्यात आली आहे. CB350 H’ness आणि CB350RS मध्ये हे इंजिन 5,500 RPM वर 21.07 Hp पॉवर आणि 3,000 RPM वर 30 Nm टॉर्क निर्माण करते, तर CB350 मध्ये 29.5 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

नवीन 2025 Honda CB350 ची किंमत

2025 होंडा CB350 चे दोन व्हेरियंट DLX आणि DLX PRO हे अनुक्रमे 2,15,500 रुपये आणि 2,18,850 रुपये या किंमतीत उपलब्ध आहेत. या मॉडेलसाठी मॅट ॲक्सिस ग्रे (Mat Axis Grey), मॅट ड्यून ब्राउन (Mat Dune Brown), रेबेल रेड मेटॅलिक (Rebel Red Metallic), पर्ल इग्नियस ब्लॅक (Pearl Igneous Black) आणि पर्ल डीप ग्राउंड ग्रे (Pearl Deep Ground Grey) हे रंग पर्याय आहेत.

नवीन 2025 Honda CB350 H’ness ची किंमत

नवीन 2025 Honda CB350 H’ness DLX, DLX PRO आणि DLX PRO Chrome या तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून, याची किंमत अनुक्रमे 2,10,500 रुपये, 2,13,500 रुपये आणि 2,15,500 रुपये आहे.  यामध्ये रेबेल रेड मेटॅलिक (Rebel Red Metallic), पर्ल इग्नियस ब्लॅक (Pearl Igneous Black), पर्ल डीप ग्राउंड ग्रे (Pearl Deep Ground Grey) आणि ॲथलेटिक ब्लू मेटॅलिक (Athletic Blue Metallic) असे चार उपलब्ध आहेत.

नवीन 2025 Honda CB350RS  ची किंमत

2025 होंडा CB350RS चे DLX आणि DLX PRO हे व्हेरियंट अनुक्रमे 2,15,500 रुपये आणि 2,18,500 रुपये  या किंमतीत उपलब्ध आहेत. ही बाईक  रेबेल रेड मेटॅलिक (Rebel Red Metallic), पर्ल इग्नियस ब्लॅक (Pearl Igneous Black), पर्ल डीप ग्राउंड ग्रे (Pearl Deep Ground Grey) आणि मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक (Mat Axis Grey Metallic) या रंगात उपलब्ध आहे.

होंडाच्या या नव्या बाईक्स केवळ लूकसाठीच नाहीत, तर दमदार परफॉर्मन्स आणि पर्यावरणपूरक इंधनावरही आधारित आहेत. तुम्ही जर नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच होंडाच्या या गाड्यांचा विचार करू शकता.