Home / देश-विदेश / ISIS Terrorists : दिल्ली-मध्यप्रदेशसह ४ राज्यांतून ५ संशयित दहशतवादी अटक

ISIS Terrorists : दिल्ली-मध्यप्रदेशसह ४ राज्यांतून ५ संशयित दहशतवादी अटक

ISIS Terrorists – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police’s Special Cell) केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने मोठी कारवाई करत आयएसआयएस मॉड्यूलचा पर्दाफाश...

By: Team Navakal
ISIS Terrorists

ISIS Terrorists – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police’s Special Cell) केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने मोठी कारवाई करत आयएसआयएस मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या कारवाईत दिल्ली, मध्यप्रदेश, तेलंगणातील (Telangana) हैदराबाद आणि झारखंडातील (Jharkhand) रांची येथून पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

पाच जणांमधील अशरफ दानिश (Ashraf Danish)याला रांची येथून पकडण्यात आले. त्याच्या ठिकाणावरून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे, विविध प्रकारची अॅसिड, सल्फर पावडर, तांब्याचे पत्रे, बॉल बेअरिंग, इलेक्ट्रॉनिक सर्किट, मोबाईल, लॅपटॉप (laptops)आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. मूळचे मुंबईचे असलेले आफताब व सुफियान (Aftab and Sufiyan)यांना दिल्लीमध्ये अटक करण्यात आली आहे.

त्यांच्या मुंबईतील ठिकाणांवर छापे टाकून शस्त्रे व आयईडी तयार करण्याचे साहित्यही जप्त केले आहे. सर्व संशयित सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानस्थित हँडलरच्या (Pakistan-based handler) संपर्कात होते. ते भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ते सोशल मीडियावरून तरुणांना कट्टरवादी बनवून आपल्या गटात भरती करत होता. सांप्रदायिक तेढ निर्माण करून धार्मिक सलोखा बिघडवणे हा त्यांचा उद्देश होता.

यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये याच प्रकरणात डॉ. इश्तियाकला (Dr. Ishtiyaq) रांची येथून अटक करण्यात आले होते. त्यावेळी दानिश फरार झाला होता. हरियाणामध्ये प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीचे नावही या मॉड्यूलच्या चौकशीतून कळले होते. त्यानंतर तिथून ६ ते ७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.


हे देखील वाचा

कपिल शर्मा शोमध्ये मुंबईचा बॉम्बे उल्लेख ! मनसे आक्रमक

एल्गार परिषद जामीन कोर्टाने तुरुंगाधिकाऱ्याला फटकारले

राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरून आता थेट CRPF ने पाठवले पत्र; ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार

Web Title:
संबंधित बातम्या