Home / देश-विदेश / Aadhar card update: आता विद्यार्थ्यांचे आधार कार्डशाळेतून अपडेट करता येणार

Aadhar card update: आता विद्यार्थ्यांचे आधार कार्डशाळेतून अपडेट करता येणार

Aadhaar card update

Aadhar card update – आता शाळांमध्येच (School) विद्यार्थ्यांचे (student) आधार कार्ड (Aadhar card update) बायोमेट्रिक (Biometric) अपडेट केले जाणार आहे. यूआयडीएआय (UIDAI) म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने यासाठी सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत ५ ते १५ वयोगटातील मुलांचे आधार बायोमेट्रिक अपडेट केले जातील.

या उपक्रमामुळे देशभरातील तब्बल १७ कोटी प्रलंबित आधार अपडेट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. शाळांमध्ये कॅम्प पद्धतीनेच विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट वेगाने पूर्ण करता येईल.शाळांना थेट माहिती उपलब्ध करून दिली जाईल.यासाठी यूआयडीएआयने शालेय शिक्षण विभागाला सोबत घेतले असून,यूडायस + अ‍ॅप्लिकेशनवर शाळांना नेमके कोणत्या विद्यार्थ्यांचे आधार अपडेट प्रलंबित आहे हे दिसणार आहे. त्यामुळे शाळांना सर्व विद्यार्थ्यांचे अपडेट एका ठिकाणी पूर्ण करण्यास सोपे होईल,असे यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

यामुळे कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट करणे बाकी आहे,याची माहिती शाळांना बघता येईल.