मुंबई – अभिनेता जॉन अब्राहम (Actor John Abraham)यांनी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई (Chief Justice Bhushan Gavai,)यांना पत्र लिहून दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थळात नेण्याच्या सर्वोच्च न्यालयाच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. जॉन अब्राहमने हा आदेश बेकायदेशीर, अव्यवहारी आणि अमानवीय असल्याचे म्हटले आहे. अब्राहमसह रवीना टंडन (Raveena Tandon,), जान्हवी कपूर, वरुण धवन, वरुण ग्रोवर, सान्या मल्होत्रा, स्वरा भास्कर, वीर दास, चिन्मयी श्रीपाद (Chinmayi Sripaada)बॉलीवूड कलाकारांनीही या निर्णयाला विरोध केला आहे.
अभिनेता जॉन अब्राहमने पत्रात लिहिले आहे की, हे कुत्रे भटके नसून दिल्लीतील समाजाचा (Delhi’s community) भाग असलेले आहेत. अनेकांनी त्यांचा स्वीकार केला आहे, त्यांच्यावर प्रेम केले आहे. ते अनेक पिढ्यांपासून माणसांच्या शेजारी राहून, दिल्लीकरच झाले आहेत. या कुत्र्यांचे दिल्लीच्या शहरी पर्यावरणातील महत्त्व आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश (Supreme Court’s order)अॅनिमल बर्थ कंट्रोल नियम,(Animal Birth Control Rules) २०२३ च्या विरोधात आहे. या नियमांनुसार भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण करून त्यांना त्याच परिसरात परत सोडले पाहिजे.
या पूर्वीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांनीही या मानवी दृष्टीकोनातून व्यवस्थापन पद्धतीला मान्यता दिली आहे. जेथे हा कार्यक्रम प्रामाणिकपणे लागू झाला. तेथे चांगले परिणाम दिसले आहेत. जयपूरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक कुत्र्यांची (over 70% of dogs)नसबंदी झाली, लखनौमध्ये हा आकडा ८४ टक्के इतका आहे. यामुळे कुत्र्यांचे वर्तन सुधारते आणि रेबीजसारख्या (rabies) रोगांचा धोकाही कमी होतो. दिल्लीमध्ये अंदाजे १० लाख कुत्रे आहेत. त्यांना सर्वांना एका ठिकाणी गोळा करणे किंवा स्थलांतरित करणे अव्यावहारिक आणि अमानवी आहे.