Adnan Sami | प्रसिद्ध गायक अदनान सामी (Adnan Sami) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. विविध विषयांवर मत व्यक्त केल्याने सामी नेहमीच चर्चेत असतात.आता मुंबई विमानतळावरील एका सेवेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई विमानतळावरच्या ‘प्रणाम मीट एंड ग्रीट सर्विस’बाबत नाराजी व्यक्त केली. एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत त्यांनी ही सेवा ‘अत्यंत अकार्यक्षम, निष्काळजी आणि आळशी’ असल्याचं म्हटलं आणि मुंबई विमानतळाच्या अधिकृत खात्याला (CSMIA) टॅग करत या सेवेबाबत सुधारणा करण्याची मागणी केली.
“मुंबई विमानतळावरची प्रणाम सेवा ही भारतातली सर्वात वाईट सेवा आहे. यांना ग्राहकांची काळजीच नाही! ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे,” असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. त्यांनी पुढे लिहिलं, “मुंबई विमानतळाने याकडे गंभीर लक्ष द्यायला हवं आणि प्रणाममध्ये तातडीने सुधारणा करायला हवी.”
Dear Mr Sami, thank you for writing to us. We are really concerned to hear this. We take your feedback very seriously and have communicated it to the concerned team for their attention. The comfort, safety and well-being of our passengers is our topmost priority. Team CSMIA
— Mumbai Airport (@CSMIA_Official) May 31, 2025
या पोस्टनंतर लगेचच मुंबई विमानतळ प्रशासनाने प्रत्युत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, “तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला खूप वाईट वाटलं. तुमचं मत आम्ही संबंधित टीमकडे पोहोचवलं असून, प्रवाशांचा आराम आणि सुरक्षितताच आमचं मुख्य ध्येय आहे.”
मात्र हे उत्तर अदनान सामींना समाधानकारक वाटलं नाही. त्यांनी उत्तर दिलं, “शब्दशः काहीच अर्थ नसलेल्या साच्यातल्या ‘बॉट रिप्लाय’ पेक्षा अधिक अपमानकारक काहीच नाही!”
काय आहे ‘प्रणाम’ सेवा?
‘प्रणाम’ ही सेवा प्रवाशांचा विमानतळावरचा अनुभव सुलभ आणि आरामदायक करण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे. यात फास्ट-ट्रॅक इमिग्रेशन, वैयक्तिक सहाय्यता, पोर्टर सेवा, लाउंज अॅक्सेस आणि कस्टम्स औपचारिकतेचं व्हीआयपी व्यवस्थापन अशा अनेक सुविधा असतात.
अदनान सामी यांनी मात्र पोस्टमध्ये त्यांना आलेल्या समस्येबाबत अधिक तपशील दिलेले नाहीत.