पाकिस्तानला साथ देणं पडलं महागात! तुर्कीला आणखी एक झटका, एअर इंडियाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Air India To Drop Turkish Maintenance Service |

Air India To Drop Turkish Maintenance Service | भारतीय विमान कंपनी एअर इंडिया (Air India) लवकरच टर्किश टेक्निक (Turkish Technic) या कंपनी सोबतची भागीदारी समाप्त करणार आहे. ही कंपनी एअर इंडियाच्या बोइंग 777 विमानांच्या देखभालीसाठी सेवा पुरवत होती. ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) दरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर आता केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.

केंद्र सरकारने तुर्कीशी संबंधित कंपनीचे व्यापार करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीशी संबंधित सेलेबी एव्हिएशन (Celebi Aviation) या कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली होती. तसेच, इंडिगो एअरलाइनला तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार पूर्णतः संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता एअर इंडियाकडून देखील अशाच प्रकारचे निर्णय घेण्यात आला आहे.

एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन (Campbell Wilson) म्हणाले की,, “जर व्यवसाय चालू ठेवण्यासंबंधी चिंता असेल, तर आम्ही निश्चितच नवीन पर्याय शोधू. जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे.” याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान (Operation Sindoor) पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर केला होता. त्यामुळे भारत सरकारने तुर्की कंपन्यांशी व्यवहार सामान्य पद्धतीने ठेवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एअर इंडियाचे बदलते धोरण

एअर इंडिया आपल्या लांब पल्ल्याच्या विमानताफ्यासाठी एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (Aया सरकारी उपक्रमावर अधिक विश्वास ठेवत आहे. काही विमानांची देखभाल अबू धाबी (Abu Dhabi) आणि सिंगापूर (Singapore) येथेही केली जात आहे.

सीईओ विल्सन यांनी स्पष्ट केले की, “AIESL हा एकमेव मोठा पर्याय आहे, पण त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या पुनर्वसन आणि रेट्रोफिट करण्याची पुरेशी क्षमता नाही. त्यामुळे काही विमाने भारताबाहेर पाठवावी लागत आहेत.” यावेळी बोलताना त्यांनी एअर इंडियाची विमाने ही देखील व दुरुस्तीसाठी टर्किश टेक्निकऐवजी इतर देशांमध्ये पाठवली जातील.

उड्डाण मार्गांमध्ये बदल

पाकिस्तानच्या हवाई हद्दीवरील बंदीमुळे उत्तर अमेरिकेतील काही विमानांना वेगळ्या आणि अधिक लांब मार्गांवरून उड्डाण करावे लागत आहे. काही नॉन-स्टॉप सेवा आता वन-स्टॉप झाल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम विमानतळ शुल्क आणि इंधन खर्चावर होत आहे.

विल्सन म्हणाले, “यामुळे मोठा अतिरिक्त खर्च येतो, आणि तो शेवटी ग्राहकांवर परिणाम करतो. त्यामुळे परिस्थिती शक्य तितक्या लवकर सुधारावी अशी आमची अपेक्षा आहे, पण हा निर्णय आमच्या हातात नाही.”