Australia Immigration Protest: ऑस्ट्रेलियामध्ये इमिग्रेशन (immigration) विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. निदर्शने केली. ‘मार्च फॉर ऑस्ट्रेलिया’ (March for Australia) नावाच्या या रॅलीत विशेषतः भारतीय स्थलांतरितांना (Indian migrants) लक्ष्य करण्यात आले.
ऑस्ट्रेलिया सरकारने या निदर्शनांचा निषेध केला असून, हे आयोजन द्वेष पसरवणारे आणि निओ-नाझींशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.
रॅलीतील प्रमुख मुद्दे आणि मागण्या
या आंदोलकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकांमध्ये भारतीय वंशाच्या रहिवाशांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. एका पत्रकावर “5 वर्षांत ग्रीक आणि इटालियन लोकांपेक्षा जास्त भारतीयांची संख्या वाढली… आणि हे फक्त एका देशाचे आहे. हे सामान्य सांस्कृतिक बदल नाही, तर ‘रिप्लेसमेंट’ आहे” असा मजकूर होता.
या आंदोलकांनी वाढत्या लोकसंख्येमुळे रुग्णालयातील प्रतीक्षा वेळ, घरांची समस्या आणि सार्वजनिक सेवांवरील ताण याविषयी नाराजी व्यक्त केली.
‘मार्च फॉर ऑस्ट्रेलिया’च्या वेबसाइटनुसार, इतर देशातून येणाऱ्या नागरिकांमुळे ऑस्ट्रेलियातील सामाजिक बंध तोडले आहेत. अनेक आंदोलकांनी शांततेचा दावा केला आहे. मात्र, सोबतच, इमिग्रेशन धोरण समाप्त करण्याची मागणी करत आहेत.
राजकीय प्रतिक्रिया आणि पोलिसांची भूमिका
या आंदोलनांवर ऑस्ट्रेलियातील राजकीय वर्तुळातून जोरदार टीका झाली. कामगार पक्षाचे मंत्री मरे वॉट यांनी ‘हे आंदोलन द्वेष आणि फूट पाडण्यासाठी आयोजित केले आहे’ असे म्हणत निषेध केला. ‘आमच्या देशात फूट पाडणाऱ्या लोकांसाठी जागा नाही’ असे गृहमंत्री टोनी बर्क यांनी स्पष्ट केले.
मेलबर्नमध्ये आंदोलक आणि त्यांना विरोध करणाऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले.. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पेपर स्प्रे आणि लाठीमार केला. या संघर्षात सहा लोकांना अटक करण्यात आली आणि दोन अधिकारी जखमी झाले.
सिडनीमध्ये 5,000 ते 8,000 लोक जमले होते, तर त्याचवेळी शेकडो लोकांनी ‘रिफ्युजी ॲक्शन कोलिशन’च्या बॅनरखाली प्रति-आंदोलन (counter-protest) केले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…
खानचंदानींच्या मृत्यूला उबाठा नेता जबाबदार! पतीचा पत्रकार परिषदेत आरोप