Ayushman Vay Vandana Card | भारत सरकारने 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ (Ayushman Vay Vandana Card) द्वारे 70 वर्षांवरील ज्येष्ट नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सोय मिळणार आहे. हे कार्ड आयुष्मान भारत योजनेचा (Ayushman Bharat Yojana) भाग असून, ऑक्टोबर 2024 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (AB PM-JAY) लागू करण्यात आले आहे.
कोणताही 70 किंवा त्याहून अधिक वयाचा भारतीय नागरिक हे कार्ड मिळवू शकतो. उत्पन्न मर्यादा, आधीची पात्रता किंवा इतर आरोग्य योजना याचा विचार केला जाणार नाही. आधीच AB PM-JAY योजनेत समाविष्ट असलेल्यांना हे टॉप-अप (top-up) कार्ड म्हणून मिळेल.
या योजनेचे मुख्य फायदे
- 5 लाख रुपयांचे वार्षिक आरोग्य विमा
- 2 7 वैद्यकीय विशेषतांमध्ये1,961 वैद्यकीय प्रक्रियांवर उपचार.
- कोणताही प्रतीक्षा कालावधी न ठेवता पूर्वीपासून असलेल्या आजारांचाही समावेश
- देशभरातील 30,072 योजनेत समाविष्ट रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार, यामध्ये 13,352 खाजगी रुग्णालयांचा समावेश
नोंदणी कशी करावी?
- Google Play Store वरून ‘आयुष्मान ॲप’ (Ayushman App) डाउनलोड करा
- ‘लाभार्थी’ किंवा ‘ऑपरेटर’ म्हणून लॉगिन करा
- Mobile number, captcha, OTP वापरून खात्री करा
- आधार आणि राज्य यांची माहिती भरून ई-केवायसी (eKYC process) पूर्ण करा
- लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आणि OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा
- सर्व माहिती भरल्यानंतर कार्ड डाउनलोड करता येईल
या उपचारांचा समावेश :
- हेमोडायलिसिस/पेरिटोनियल डायलिसिस
- टोटल नी व हिप रिप्लेसमेंट (Total Knee and Hip Replacements)
- कार्डिओलॉजी उपचार (Cardiology treatments) – जसे की PTCA, पेसमेकर
- स्ट्रोक आणि कॅन्सर केअर
- ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया
कार्ड कोठे वापरता येईल?
देशभरातील सरकारी व खाजगी मिळून एकूण 30,072 रुग्णालयांमध्ये (त्यातील 13,352 खाजगी सुविधा) हे कार्ड वैध असेल.