Indonesia Volcano Eruption | इंडोनेशियातील माउंट लेवोटोबी लाकी-लाकी (Mount Lewotobi Laki-Laki) या ज्वालामुखीचा विस्फोट झाला आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे (Volcanic Eruption) 10 किलोमीटर उंचीपर्यंत राखेचा आणि धुराचा प्रचंड लोट आकाशात पसरल्याचे पाहायला मिळाले.
ज्वालामुखीच्या उद्रेकाचे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. प्रसिद्ध पर्यटन स्थळ बाली (Bali) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत.
पूर्व फ्लोरेस बेटावर झालेल्या या उद्रेकामुळे प्रशासनाला अॅलर्ट जाहीर करावं लागलं. इग्नाटी नगुराह राई विमानतळाचे ऑपरेटर अंगकासा पुरा इंडोनेशियाने माहिती दिली की, “ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत फ्लाइट्स रद्द झाल्या.”
जेटस्टार, व्हर्जिन ऑस्ट्रेलिया, एअर इंडिया, एअर न्यूझीलंड, टायगरएअर आणि जुनायाओ एअरलाईन्सच्या फ्लाइट्सवर याचा परिणाम झाला. दिल्लीहून बालीला जाणारं एअर इंडियाचं विमान (AI2145) मध्येच परत बोलावण्यात आलं आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे दिल्लीत उतरवलं.
एअर इंडियाने प्रवाशांना हॉटेल्सची व्यवस्था आणि पूर्ण परतावा किंवा मोफत रीशेड्यूलिंग असे पर्याय दिले. जेटस्टारने सांगितलं की, राखेचा ढग रात्री उशिरा साफ होण्याची शक्यता आहे, एअर एशियाच्या (AirAsia) लाबुआन बाजोला जाणाऱ्या देशांतर्गत फ्लाइट्सही रद्द झाल्या.
ज्वालामुखीच्या राखेमुळे जवळच्या गावांमधील नागरिकांना स्थलांतर करावं लागलं, आणि मुसळधार पावसामुळे लावाच्या प्रवाहाचा धोका वाढला आहे. इंडोनेशियाच्या आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेनेभूकंपाचे धक्के आणि सततच्या ज्वालामुखी ॲक्टिव्हिटीचा इशारा दिला. भूविज्ञान संस्थेने) रहिवाशांना आणि पर्यटकांना ज्वालामुखीच्या क्रेटरपासून 7 किलोमीटरच्या परिसरात जाणं टाळण्याचा सल्ला दिला. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.