बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण : पोलिसांची मोठी कारवाई, RCB च्या अधिकाऱ्यासह 4 जणांना अटक

Bengaluru Stampede

Bengaluru Stampede | बंगळूरुतील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर RCB च्या IPL विजयानंतर आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 60 हून अधिक जखमी झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.

पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींमध्ये आरसीबीच्या अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. पोलिसांनी RCB चा मार्केटिंग अधिकारी निखिल सोसाळेला अटक केले आहे. तो टीमच्या प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटीजसांभाळतो आणि खेळाडू व फ्रँचायझी यांच्यातील मुख्य दुवा आहे. सोशल मीडियाचे संचालनही त्याच्याकडे होते. पोलिसांनी त्याला मुंबईला जात असताना केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 6:30 वाजता अटक केली.

इतर अटकेतील तिघे DNA Entertainment Pvt. Ltd. या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे कर्मचारी आहेत . यामध्ये नील मॅथ्यू (IPL इव्हेंट प्रमुख), किरण आणि सुमंथ यांचा समावेश आहे.

ही अटक भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली ‘सदोष मनुष्यवध या आरोपांतर्गत दाखल झालेल्या एफआयर नंतर करण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी RCB, KSCA व DNA Entertainment यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.

या आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागाकडे (Crime Investigation Department) सोपवले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) चे सचिव शंकर आणि खजिनदार जयराम फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, RCB च्या विजय सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत हजारो लोक जमले होते. परवानगी न घेता सोशल मीडियावर कार्यक्रमाची जाहिरात करण्यात आल्याचा आरोप एआयआर मध्ये नमूद आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांचे निलंबन केले आहे.