पाकिस्तानमध्ये अशांतता!  BLA चा पाकच्या लष्करावर मोठा हल्ला, 12 जवान ठार

BLA Attack on Pakistan Army

BLA Attack on Pakistan Army | भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या (Pakistan Army) गाडीवर हल्ला झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army – BLA) ने हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

या स्फोटात १२ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बीएलएने लष्कराच्या गाडीवर हल्ल्यासाठी आयईडीचा (IED – इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) वापर केला.

पीटीआय सार, “बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी कच्छी जिल्ह्यातील माच भागाजवळ सुरक्षा दलाच्या गाडीला आयईडीद्वारे लक्ष्य केले.”

या स्फोटात स्पेशल ऑपरेशन्स कमांडर तारिक इम्रान (Tariq Imran) आणि सुभेदार उमर फारूक (Subedar Umar Farooq) यांच्यासह लष्कराच्या गाडीतील १२ जवान ठार झाले. स्फोटात गाडीही पूर्णपणे नष्ट झाली आहे.

हल्ल्याचा व्हिडिओ समोर

पाकिस्तानी लष्कराच्या गाडीवरील हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मोठा आयईडी स्फोट दिसत आहे. स्फोटानंतर लष्कराच्या गाडीचे तुकडे तुकडे झाले. या हल्ल्यात गाडीतील १२ पाकिस्तानी सैनिक जागीच ठार झाले. स्फोट इतका मोठा होता की, गाडीचा पत्ताही लागला नाही. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे.

लाहोरमध्ये स्फोट

दरम्यान, गुरुवारी पाकिस्तानमधील सर्वात प्रसिद्ध शहर लाहोरमध्येही (Lahore) अनेक स्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत. माहितीनुसार, हे स्फोट लाहोर विमानतळाजवळ झाले आहेत. पाकिस्तानी लष्कराने संपूर्ण परिसर सील केला असून, परिसरात सायरनचा आवाज ऐकू येत आहे. पाकिस्तानच्या स्थानिक जिओ न्यूजने (Geo News) या स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’

यापूर्वी, भारताने ६-७ मे च्या रात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक (Air Strike) केली होती. भारत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर भारताने हल्ला केला होता, ज्यात अनेक दहशतवादी मारले गेले. पहलगाममधील (Pahalgam) दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली होती, असे भारताने म्हटले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य केले गेले नाही आणि कोणत्याही सामान्य नागरिकाला हानी पोहोचली नाही, असेही भारताने स्पष्ट केले होते. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले होते.