मडगाव – दक्षिण गोवा जिल्ह्यातील मडगाव (madgaon)- आके येथील ब्लिंकिट (Blinkit)या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध जोरदार निदर्शने (protest) केली. कमी प्रोत्साहन भत्ता देऊन कोणतेही कारण नसताना डिलिव्हरी बॉईजना कामावरून काढले जात असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे वस्तू घरोघरी (door-to-door deliveries) पोहोचवणाऱ्या आके मडगाव येथील ब्लिंकिट कंपनीचे आऊटलेट आहे. याठिकाणी काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयजनी कंपनी व्यवस्थापन अन्याय करत असल्याचा आरोप करत निदर्शने केली. यातील कर्मचारी प्रमुख सादिक हैदर (Protest leader Sadiq Haider)म्हणाला की,कंपनीचे व्यवस्थापक व शाखा व्यवस्थापक (managers)हे मनमानी कारभार करत आहेत. यापुर्वी दिवसाला ३० डिलीव्हरी (32 deliveries a day) केल्यानंतर दोन ते तीन हजारांचा फायदा होत होता. त्यामुळे गाडीचा खर्च, इंधन व इतर खर्च वजा केल्यानंतरही काही पैसे उरत होते. मात्र आता दिवसाला ३२ डिलिव्हरी केल्यानंतरही ५०० रुपयांचा (500 rupees) फायदा होतो. याबाबत विचारणा केली तर थेट कामावरून काढून टाकले जात आहे.तरी आता राज्य सरकारनेच आम्हाला न्याय (justice) द्यावा,अशी मागणी आहे.