Pahalgam Attack | भारताने चिनाब नदीचे पाणी अडवले; पाकिस्तानला धडा शिकवण्याची सुरुवात!

Chenab River

Pahalgam Attack | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. या माध्यमातून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. आता भारताने काही जलविद्युत प्रकल्पांचे दरवाजे बंद करत चिनाब नदीचे पाणी अडवले आहे.

चिनाब नदीची (Chenab River) पातळी अनेक वर्षांनंतर प्रथमच कमरेखाली गेली आहे. यामुळे जम्मूच्या अखनूर परिसरात वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. ही परिस्थिती रियासी आणि रामबन जिल्ह्यातील सलाल आणि बगलीहार जलविद्युत प्रकल्पांचेसर्व्हिस गेट्स बंद करण्यात आल्यामुळे उद्भवली. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

रिपोर्टनुसार, हे गेट्स बंद करण्यामागे गाळ काढण्याची प्रक्रिया आणि धरणात पाणीसाठा करण्याचे कारण देण्यात आले. सध्या भारत-पाकिस्तान दरम्यानचा सिंधू जल करार (Indus Waters Treaty) केंद्र सरकारच्या पुनरावलोकनात असताना, हे पावले धोरणात्मक मानले जात आहेत.

सलाल आणि बगलीहार ही दोन्ही धरणं रन-ऑफ-द-रिव्हर (Run-of-the-river) प्रकारात असून, त्यामुळे भारताला पाणी सोडण्याच्या वेळेवर नियंत्रण ठेवता येते. पाकिस्तानने यावर आक्षेप घेतला होता आणि जागतिक बँकेकडे हस्तक्षेपाची मागणी केली होती. त्यानंतर भारताने धरणाच्या उंचीमध्ये बदल करत साठवण क्षमता 13.5% नी कमी केली होती.

सध्या रब्बी हंगामात पाण्याची गरज कमी असली, तरी आगामी भातशेतीच्या (paddy cultivation) हंगामात पाण्याची आवश्यकता मोठी असेल. एका अधिकाऱ्याने सांगितले, “गेट्स बंद करून जरी पाणी काही काळ थांबले तरी, भारत पाकिस्तानला कठोर संदेश देत आहे की आपण सर्व स्तरांवर कठोर पावले उचलण्यास तयार आहोत.”

बगलीहार आणि सलाल धरणांतील जलाशय भरताच काही गेट्स उघडण्यात आले आणि पाकिस्तानच्या दिशेने पाणी सोडण्यात आले. मात्र, पातळी इतकी कमी झाल्यामुळे 10 सप्टेंबर 1992 च्या पुरात वाहून गेलेल्या करण पुलाचे ( अवशेषदेखील नदीत दिसून आले. अनेकजण नदी पात्रात सोने -चांदी देखील शोधत होते.

पाकिस्तानमधील मोठा भाग चिनाब नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताने हे पाणी अडवून पाकला कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केला.

Share:

More Posts