गुजरातमध्ये सैयारा चित्रपट पाहून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या ?

class 10 girl dies by suicide


अहमदबाद – गुजरातच्या अहमदबादमध्ये नवरंपुरा (Navrangpura)भागातील शाळेत एका दहावीच्या विद्यार्थिनीने (Class 10 student)चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (suicide) केली. ही घटना शाळेतील सीसीटीव्हीमध्ये कैद (school’s CCTV)झाली असून याचे व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल (social media)होत आहेत.दरम्यान, काही नेटकऱ्यांनी याचा संबंध सैयारा (Sairya) चित्रपटाशी जोडला आहे. सैयारा चित्रपट पाहून या मुलीचे मानसिक संतुलन बिघडले असावे. त्यातुन या मुलीने आत्महत्या केली असवी,असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी नवरंगपुरा पोलिसांनी शाळेतील शिक्षक (school teachers), कर्मचारी आणि काही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी १२:३० च्या सुमारास विद्यार्थीनी शाळेच्या वर्हांड्यात हाताच्या बोटात किचेन रिंग फिरवत चालताना दिसत आहे. नंतर ती अचानक रेलिंगवर चढली आणि खाली उडी (jumps off.) घेतली.

याबाबत शाळेचे व्यवस्थापक प्रग्नेश शास्त्री (School administrator Pragnesh Shastri)यांनी सांगितले की, ही विद्यार्थिनी ५ वर्षांपासून या शाळेत शिकत आहे. एका महिन्याच्या सुटीनंतर तिने शाळेत येण्यास सुरुवात केली होती. ती १० दिवसांपूर्वीच शाळेत पुन्हा यायला लागली. तिने शाळेत आपले वैद्यकीय प्रमाणपत्रही जमा केले होते. मुख्याध्यापकांनी सांगितले की,तिच्या वडिलांनी सकाळी तिला शाळेत सोडले होते. वर्ग सुरू असताना तिने अचानक ओरडायला सुरुवात केली. शिक्षकांनी तिला शांत बसवले होते.