चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या! आरोपीची फाशीची शिक्षा रद्द

bombay high court

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने(The Bombay High Court) अडीच वर्षांच्या मुलीवर (2.5-year-old girl.)अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणार्‍या आरोपीची फाशीची शिक्षा रद्द केली. जलदगती कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणातील अतिरिक्त पुराव्यांच्या आधारे नव्याने युक्तीवाद ऐकून घ्यावेत, असे निर्देश देत उच्च न्यायालयाने आरोपीची शिक्षा (punishment)रद्द केली. हा निर्णय न्या. सारंग कोतवाल (Justice Sarang Kotwal) आणि न्या. श्याम चांडक (Justice Shyam Chandak.)यांच्या खंडपीठाने दिला.

ही घटना फेब्रुवारी २०२१ साली पुण्यात (Pune)घडली. फेब्रुवारी २०२२ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून फाशीचे शिक्षा सुनावली. त्या शिक्षेला आरोपीने आव्हान (challenged)दिले. उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब करुन घेण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाने याचिका (petitions) दाखल केली. या दोन्ही याचिकांवर न्या. कोतवाल आणि न्या. चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले व आरोपीची फाशीची शिक्षा रद्द केली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, हा फाशीचा खटला आहे, त्यामुळे आरोपीला स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्व संधी मिळाल्या पाहिजेत. खटला सुरु असलेल्या न्यायालयासमोरच अतिरिक्त पुराव्यांबाबत सर्व पैलूंवर युक्तिवाद (argue)करण्याची संधी आरोपीला मिळायला हवी.