India’s Defence Budget | ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) यशस्वी झाल्यानंतर भारताच्या संरक्षण क्षमतेत अधिक बळकटी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच 50 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्याची शक्यता आहे. संरक्षण बजेटमध्ये (Defence Budget) ही पुरवणी मागणी सादर केली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, या प्रस्तावाला संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या अतिरिक्त निधीतून सशस्त्र दलांच्या अत्यावश्यक खरेदी, शस्त्रास्त्र अपग्रेड, नव्या प्रणालींची गुंतवणूक तसेच संशोधन आणि विकास (Research and यामध्ये गती येणार आहे.
यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) संरक्षणासाठी विक्रमी ₹6.81 लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत 9.53 टक्क्यांनी जास्त आहे. 2014-15 मध्ये ही तरतूद ₹2.29 लाख कोटी इतकी होती. म्हणजेच एनडीए सरकारच्या काळात संरक्षण बजेट जवळपास तीनपट वाढले आहे. सध्या ते एकूण केंद्रिय खर्चाच्या 13.45% इतके आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय हवाई संरक्षण व्यवस्थेची कसोटी झाली आणि ती यशस्वी झाली. या मोहिमेत सीमेचे उल्लंघन न करता पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यावेळी स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ‘आकाश’ (Akash system), बराक-8 SAM, तसेच एस-400 ट्रायम्फ , पेचोरा , OSA-AK, आणि LLAD तोफा यांचा यशस्वी वापर झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 12 मे रोजी केलेल्या भाषणात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “मेड-इन-इंडिया (Made-in-India) शस्त्रास्त्रांची विश्वासार्हता आता पूर्ण जगासमोर सिद्ध झाली आहे. 21 व्या शतकातील युद्धात भारत बनवत असलेल्या संरक्षण उपकरणांचा काळ सुरू झाला आहे.”