Humayuns Tomb Dome Collapses: दिल्लीतील (Delhi) निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूनच्या मकबऱ्याजवळच्या (Humayun’s Tomb) पट्टे शाह दर्ग्याची एक जुनी भिंत कोसळूनमोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. तर काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शुघटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दल आणि इतर बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले.
बचावकार्य आणि मृतांची माहिती
आतापर्यंत 11 लोकांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आले आहे आणि त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये 79 वर्षीय आणि 35 वर्षीय दोन पुरुषांचा समावेश आहे. तसेच, 40 आणि 42 वर्षे वयोगटातील तीन महिलांचाही यात समावेश आहे.
जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून, इतरांची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी दर्ग्याचा डीव्हीआर ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्यायादीत समाविष्ट असलेला हुमायूनचा मकबरा, हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दुर्घटनेनंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. एएसआयने माहिती दिली की, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेला हुमायूनचा मकबरा “पूर्णपणे सुरक्षित” आहे आणि दुर्घटनेचा या ऐतिहासिक स्मारकाशी कोणताही संबंध नाही. ही घटना मकबऱ्याला लागू असलेल्या एका दर्ग्याची भिंत कोसळल्यामुळे घडली.