Donald Trump Diagnosed With Chronic Venous Insufficiency | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना ‘क्रोनिक व्हेनस इनसफिशियन्सी’ (Chronic Venous Insufficiency) या आजाराचे निदान झाल्याची माहिती व्हाईट हाऊसने (White House) दिली आहे. पायांना सूज आणि हातावर जखमा आढळल्यानंतर केलेल्या तपासणीत हे निदान झाले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून ट्रम्प यांना पायांमध्ये सौम्य अस्वस्थता जाणवत होती. ट्रम्प यांना झालेला ‘क्रोनिक व्हेनस इनसफिशियन्सी’ आजार नक्की काय आहे व याची लक्षणं काय? जाणून घेऊया.
Chronic Venous Insufficiency आजार काय आहे?
ट्रम्प यांना ‘डीप व्हेन थ्रोम्बोसिस’ किंवा ‘आर्टेरियल डिसीज’ नाही. लॅब रिपोर्ट्स आणि इकोकार्डिओग्राम सामान्य आहेत. CVI हा शिरांचा विकार आहेजो पायांमधील शिरा खराब झाल्यामुळे विकसित होतो. शिरांमध्ये व्हॉल्व्ह असतात जे रक्त हृदयाकडे वरच्या दिशेने नेण्यास मदत करतात.
जेव्हा हे व्हॉल्व्ह खराब होतात, तेव्हा ते योग्यरित्या बंद होत नाहीत आणि रक्त मागे वाहू शकते. याला ‘व्हेनस रिफ्लक्स’ असे म्हणतात हा आजार 50 वर्षांवरील लोकांना जास्त प्रभावित करतो.
यामुळे पायांच्या खालच्या भागात रक्त साठू शकते, ज्यामुळे पाय आणि घोट्यांभोवती सूज येते. इतर लक्षणांमध्ये पायांमध्ये दुखणे, जडपणा किंवा मुंग्या येणे याचा समावेश असू शकतो.
लक्षणे आणि जखमा
पायांना सूज, दुखणे, जडपणा आणि व्हेरिकोज व्हेन्स ही CVI ची लक्षणे आहेत. ट्रम्प यांच्या हातावरील जखमांना त्यांचे डॉक्टर डॉ. बार्बाबेला यांनी वारंवार हस्तांदोलन आणि ॲस्पिरिनचा वापर कारणीभूत मानले. त्वचेची जळजळ आणि अल्सरही होऊ शकतात, असे अमेरिकन हार्ट असोसिएशनने सांगितले.
उपचार आणि गंभीरता
CVI सौम्य असला तरी भविष्यात गंभीर समस्या उद्भवू शकते. या आजारावर लवकर उपचार महत्त्वाचे आहे. कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज, वजन कमी करणे आणि व्यायाम हे उपचार आहेत. गंभीर प्रकरणांसाठी लेझर किंवा स्क्लेरोथेरपीचा वापर होतो. ट्रम्प यांच्यासाठी ही स्थिती सौम्य असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा –
INS Nistar: भारताची सागरी शक्ती वाढली! ‘INS निस्तार’ नौदलात दाखल, जाणून घ्या वैशिष्ट्ये
मेटाकडून भाषांतरात मोठी चूक, थेट मुख्यमंत्र्यांनाच मृत घोषित केले; आता मागितली माफी