Elon Musk | इलॉन मस्क यांनी सोडली डोनाल्ड ट्रम्प यांची साथ, विशेष सरकारी कर्मचारी पदाचा दिला राजीनामा

Elon Musk exits Donald Trump's administration

Elon Musk exits Donald Trump’s administration | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाइट हाऊसमध्ये परतल्यानंतर त्यांनी अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. मस्क यांच्याकडे DOGE विभागाची जबाबदारी होती. मात्र, आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

टेस्ला, स्पेसएक्स आणि X (ट्विटर) चे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क (Elon Musk) यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारी कार्यक्षमतेच्या विभागात ‘विशेष सरकारी कर्मचारी’ म्हणून नियुक्त असलेल्या मस्क यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. तसेच, संघीय नोकरशाहीत सुधारण्याच्या प्रयत्नांबाबत भूमिका स्पष्ट केली.

“विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा नियोजित कार्यकाळ संपत असताना, मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनावश्यक खर्च कमी करण्याच्या संधीबद्दल आभार मानू इच्छितो,” असे मस्क यांनी लिहिले. “DOGE चे ध्येय कालांतराने आणखी बळकट होईल, कारण हे सरकारमध्ये एक नवा मार्ग बनेल,” असेही त्यांनी नमूद केले.

हा राजीनामा ट्रम्प यांच्या एका महत्त्वाच्या विधेयकावर मस्क यांनी टीका केल्यानंतर अवघ्या 24तासांत आला. या विधेयकात कर कपात आणि स्थलांतर अंमलबजावणीची सुधारणायांचा समावेश आहे. मस्क यांनी यास “मोठे खर्चिक विधेयक” म्हणत संघीय तूट वाढवणारे आणि DOGE च्या कामात अडथळा आणणारे ठरवले होते.

या टीकेनंतर, ओव्हल ऑफिसमध्ये बोलताना ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की. “या विधेयकाच्या काही गोष्टींवर मी समाधानी नाही, पण काही गोष्टींवर मी खूप समाधानी आहे,” यामुळे पुढे विधेयकात आणखी बदल होऊ शकतात, असेही सूचित झाले.

एलोन मस्क यांचा कार्यकाळ ‘विशेष सरकारी कर्मचारी’ या भूमिकेत 130 दिवसांची अधिकृत मर्यादा पूर्ण झाल्यानंतरच संपुष्टात आला. व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की DOGE चा सरकारी खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरूच राहील.

दरम्यान, मस्क आणि ट्रम्प यांच्यातील संबंध मागील वर्षभरात काहीसे ताणले गेल्याचे पाहायला मिळाले होते. याचे मुख्य कारण म्हणजे मस्क यांनी ट्रम्प यांच्या 2024 मधील निवडणुकीसाठी जवळपास $300 दशलक्ष डॉलर्सचे आर्थिक योगदान दिल्यानंतरही अनेकबाबींमध्ये दोघांमध्ये मतभेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.