Home / देश-विदेश / एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी; पोलिसांकडून आरोपीला अटक

एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी; पोलिसांकडून आरोपीला अटक

Elvish Yadav Firing Case

Elvish Yadav Firing Case: यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) याच्या गुरुग्राम येथील घरावर गोळीबार (Elvish Yadav Firing Case) करणाऱ्या आरोपीला फरिदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. आज (22 ऑगस्ट) पहाटे पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर (encounter) या आरोपीला अटक करण्यात आली.

आरोपीच्या पायाला गोळी लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव ईशांत उर्फ ईशू गांधी असे आहे.

नेमकी घटना काय? (Elvish Yadav Firing Case)

एल्विश यादवच्या घरावर 17 ऑगस्ट रोजी दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यावेळी एल्विश यादव घरी नव्हता, मात्र त्याचे कुटुंबीय घरात होते. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.

आज सकाळी फरिदाबादच्या सेक्टर 77 मधील तिगाव रोडवर पहाटे 4 वाजता क्राइम ब्रांच सेक्टर 30 च्या पथकाने ईशांतला घेरले. त्यावेळी आरोपीने पोलिसांच्या दिशेने पिस्तूलने अनेक राऊंड गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात आरोपीच्या पायाला गोळी लागली, त्यानंतर त्याला पकडण्यात आले.

‘भाऊ गँग’ने घेतली होती जबाबदारी

या गोळीबारानंतर ‘भाऊ गँग’ (Bhau Gang) नावाच्या एका टोळीने सोशल मीडियावर पोस्ट करून या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. “आज एल्विश यादवच्या घरावर गोळीबार आमच्याकडून करण्यात आला आहे. त्याने सट्टेबाजी ॲप्सला प्रोत्साहन देऊन अनेक घरांची बर्बादी केली आहे,” असे त्यांनी त्या पोस्टमध्ये लिहिले होते.

याशिवाय, सट्टेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या इतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाह भविष्यात अशा हल्ल्यांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीही दिली होती.


हे देखील वाचा –

सुनेत्रा पवार RSS च्या बैठकीत; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण, स्वतः दिले स्पष्टीकरण

Dream 11 ॲप कायमचे बंद होणार? ऑनलाइन गेमिंग विधेयकामुळे कोट्यावधीचा व्यवसाय धोक्यात, ‘या’ ॲप्सना मोठा फटका

Hero MotoCorp ची नवीन Glamour X 125 बाईक लाँच; किंमत 90 हजार रुपयांपेक्षा कमी