Fauja Singh: 114 वर्षीय मॅरेथॉनपटू फौजा सिंग यांच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी NRI चालक अटकेत; फॉर्च्युनर जप्त

Fauja Singh Death

Fauja Singh Death | पंजाब पोलिसांनी 114 वर्षीय मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग (Fauja Singh) यांच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणात 30 वर्षीय अनिवासी भारतीय व्यक्तीला अटक केले आहे. या अटक केलेल्या चालकाचे नाव अमृतपाल सिंग ढिल्लन असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना घडून अवघ्या 30 तासांनंतर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून फॉर्च्युनर एसयूव्ही जप्त केली.

अमृतपाल सिंग ढिल्लन हा जालंधरच्या करतारपूरमधील दासूपूरचा रहिवासी असून, मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. तो सध्या भोगपूर पोलीस ठाण्यात चौकशीखाली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून, पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. ढिल्लनला तीन बहिणी असून, त्याची आई कॅनडामध्ये राहते.

आरोपीचा शोध कसा लावला?

पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी संशयित वाहनांची यादी तयार केली होती. त्यानंतर फॉर्च्युनर एसयूव्हीची ओळख पटली, जी कपूरथळातील वरिंदर सिंगच्या नावावर नोंदणीकृत होती. चौकशीत वरिंदरने सांगितले की, त्याने हे वाहन दोन वर्षांपूर्वी अमृतपालला विकले होते, जो नुकताच कॅनडातून परतला होता.

अपघातानंतर ढिल्लन जालंधरऐवजी गावांमधून करतारपूरला पोहोचला. प्राथमिक चौकशीत त्याने कबुली दिली की, तो मुखेरियनहून परत येत असताना व्यास पिंडजवळ वृद्धाला धडक दिली. त्याला फौजा सिंग असल्याचे माहीत नव्हते, हे त्याने नंतर बातम्यांतून समजले, असे त्याचे म्हणणे आहे.

फौजा सिंग कोण होते?

‘टर्बन टॉर्नाडो’ म्हणून ओळखले जाणारे फौजा सिंग (Marathon Runner Fauja Singh) यांचे सोमवारी व्यास गावात फिरताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने निधन झाले. लेखक खुशवंत सिं ग यांनी कुटुंबाशी बोलून एक्सवर याबाबत माहिती दिली होती, 1911 मध्ये जन्मलेले फौजा यांनी 90 व्या वर्षी मॅरेथॉन सुरू केली होती. 2004 मध्ये लंडन आणि 2011 मध्ये टोरंटो मॅरेथॉन पूर्ण करत सर्वात वयस्कर धावपटू म्हणून विक्रम केला.

हे देखील वाचा –

येमेनमधील भारतीय परिचारिका निमिषाच्या मृत्यूदंडाला स्थगिती

अंतराळवीर शुभांशू शुक्ला सुखरूप परतले! भारताने इतिहास रचला! अभिमानाचा क्षण