नवी दिल्ली- कॉंग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections) बोगस मतदार (Fake voter) प्रकरणावरून केंद्रीय निवडणूक आयोगावर (Central Election Commission) गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर आयोगाकडून राहुल गांधींना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत (Former Chief Election Commissioner OP Rawat) यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे. आयोगाने गांधींच्या आरोपांची तातडीने चौकशी करायला हवी, असे परखड मत रावत यांनी मांडले आहे.
ओ.पी.रावत यांनी म्हटले की,बंगळुरूतील (Bangalore) कथित बोगस मतदारांबाबत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगाने चौकशी करायला हवी. त्यासाठी आयोगाने कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता तपास सुरू करायला हवा.मी मुख्य निवडणूक आयुक्त असताना कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केल्यास आम्ही तात्काळ स्वतःहून तपास सुरू करत होतो आणि जनतेसमोर सत्य ठेवत होतो.अशा प्रकरणांत आम्ही पक्षांकडून आधी तक्रार मागत नव्हतो.
दरम्यान,काँग्रेसने ८ ऑगस्ट रोजी बंगळुरूमध्ये या मुद्द्यावर आंदोलन केले. त्याचदिवशी सकाळी काही लोकांना मतदार यादी डाउनलोड करण्यात अडचणी आल्याने राहुल यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने छेडछाड केली असल्याचा संशय व्यक्त झाला.मात्र,आयोगाने हे आरोप फेटाळले. आयोगाने एका ‘एक्स’ पोस्टमध्ये राहुल गांधींना आव्हान दिले की, प्रत्येक कथित बोगस मतदारासाठी शपथपत्रासह तक्रार नोंदवा किंवा देशाची माफी मागा. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनीही काँग्रेसला पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.