वॉशिंग्टन – अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Former U.S. Vice President Kamala Harris) यांनी राजकारणातून संन्यास (politics retiring)घेण्याचे संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, सध्या अमेरिकेतील राजकीय व्यवस्था मोडीस आल्यामुळे आपण हा निर्णय घेत आहोत.
कमला हॅरिस म्हणाल्या की (Harris said,), सध्या अमेरिकेतील व्यवस्था मोडकळीस (breakdown) आली आहे. अर्थात अमेरिकन लोकशाहीची (American democracy)मुलभूत मूल्ये (fundamental values)इतकी मजबूत आहेत की ती येणाऱ्या आव्हानांचा सहज मुकाबला करू शकतील. मी अनेक वर्षे पदावर घालवली आहेत. त्यामुळे आता या पुढे कोणत्याही पदासाठी न लढण्याचे ठरवले आहे. अगदी कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीतही मी नाही. मी लोकांची सेवा (public service) करणे काही सोडणार नाही. मी माझे संपूर्ण जीवन लोकांच्या सेवेसाठी घालवले आहे. माझ्या कॅलिफोर्निया (California) राज्यावर माझे प्रेम आहे. मी इथे अॅटर्नी जनरल व संसद सदस्य म्हणून काम केले आहे. आता मात्र मी कोणत्याही पदासाठी लढणार नाही.