Hercules Tiger | भारतातील ‘या’ राज्यात दिसला आशियातील सर्वात मोठा वाघ, वजन तब्बल 300 किलो

Hercules Tiger Viral Video

Hercules Tiger Viral Video | उत्तराखंडच्या (Uttarakhand) येथील फॅटो पर्यटन क्षेत्रात (Phato tourism zone) सध्या एक भलामोठा वाघ विलक्षण आकर्षण बनले आहे. जिम कॉर्बेट जंगलात आशियातील सर्वात मोठा वाघ पाहायला मिळाला आहे. या भल्यामोठ्या वाघला ‘हरक्यूलिस’ (Hercules) हे नाव देण्यात आले आहे.

सुमारे 300 किलोग्रॅम वजन आणि 7 फूट लांबीचा हा महाकाय वाघ वन्यजीव प्रेमींमध्ये आणि स्थानिकांमध्ये प्रचंड उत्सुकतेचा विषय बनला आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की, ‘हरक्यूलिस’ सध्या आशियातील सर्वात मोठा वाघ असू शकतो. या वाघाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

टेराई वेस्ट फॉरेस्ट डिव्हिजनचे (Terai West Forest Division) विभागीय वन अधिकारी प्रकाश आर्य (Prakash Arya) यांनी या वाघाबाबत माहिती दिली. “मी माझ्या संपूर्ण सेवाकाळात एवढा मोठा वाघ कधीच पाहिला नाही,” असे त्यांनी सांगितले.

वन विभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप्स बसवले आहेत. याशिवाय, स्थानिक मार्गदर्शकही वाघाला पाहून थक्क झाले आहेत.

कॉर्बेट टायगर रिझर्व्हचे संचालक डॉ. साकेत बडोला यांनी सांगितले की, 2022 मध्ये उत्तराखंडमध्ये 560 वाघांची नोंद झाली होती. ही संख्या भारताच्या वाघांच्या एकूण लोकसंख्येत मोठे योगदान देते. त्यांच्या मते, हा भरभराटीचा विकास राज्यातील पर्यावरणीय वातावरणामुळे शक्य झाला आहे.

राष्ट्रीय स्तरावर, भारतात सध्या 3682 ते 3925 वाघ असून, मध्य प्रदेश (785 वाघ) व कर्नाटक (563 वाघ) आघाडीवर आहेत.

वन्यजीव तज्ञांचं म्हणणं आहे की जर ‘हरक्यूलिस’ खरोखर आशियातील सर्वात मोठा वाघ ठरला, तर फॅटो झोनला आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.