भारतीयांसाठीची UAE ची ‘गोल्डन व्हिसा’ योजना काय आहे? कसे मिळणार नागरिकत्व, जाणून घ्या सर्वकाही

UAE Golden Visa

UAE Golden Visa | संयुक्त अरब अमिराती (यूएई) सरकारने भारत आणि बांगलादेशातील रहिवाशांसाठी ‘नॉमिनेशन-आधारित गोल्डन व्हिसा’ (UAE Golden Visa) प्रायोगिक कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत आता AED 100,000 (सुमारे 23.3 लाख रुपये) शुल्क भरून आजीवन नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

यामुळे मालमत्ता किंवा व्यवसायात गुंतवणुकीच्या सध्याच्या अटीशिवाय यूएईमध्ये (UAE) राहण्याची, काम करण्याची आणि अभ्यास करण्याची संधी मिळेल. या योजनेच्या प्रायोगिक टप्प्याची जबाबदारी रायाद ग्रुप कन्सल्टन्सीला देण्यात आली आहे.

गोल्डन व्हिसा आणि नॉमिनेशन धोरण

यूएईच्या गोल्डन व्हिसा योजनेत सध्या रिअल इस्टेट किंवा व्यवसायात गुंतवणूक करणारे आणि डॉक्टर, शास्त्रज्ञ, खेळाडू, अभियंता यांसारख्या विशेष प्रतिभांना 5 ते 10 वर्षांचा निवास मिळतो. नवीन नॉमिनेशन-आधारित धोरण मात्र आजीवन यूएईमध्ये राहण्याचे सुविधा देते.

यासाठी अर्जदारांना दुबईला भेट देण्याची गरज नाही; ते भारतातूनच पूर्व-मंजुरी मिळवू शकतात. रायाद ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रायाद कमल अयुब यांनी सांगितले की, अर्जदाराची पार्श्वभूमी, मनी लॉन्ड्रिंग आणि गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जाईल. याशिवाय, अर्जदार यूएईच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा देऊ शकतो, हेही पाहिले जाईल.

या योजनेची सुरुवात भारत आणि यूएईमधील मजबूत व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध दर्शवते, विशेषतः मे 2022 मधील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारानंतर (CEPA) आता ‘नॉमिनेशन-आधारित गोल्डन व्हिसा’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.. हा प्रायोगिक कार्यभारतीयांसाठीची UAE ची ‘गोल्डन व्हिसा’ योजना काय आहे? कसे मिळणार नागरिकत्व, जाणून घ्या सर्वकाहीक्रम भारत आणि बांगलादेशापुरता मर्यादित असून, भविष्यात चीनसह इतर CEPA देशांपर्यंत विस्तारण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांत 5,000 हून अधिक भारतीय अर्ज करतील, अशी अपेक्षा आहे.

योजनेचे फायदे

गोल्डन व्हिसा धारकांना यूएईमध्ये कुटुंबासह राहण्याची, व्यवसाय करण्याची आणि नोकर-चालक ठेवण्याची मुभा आहे. ही योजना यूएईच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आहे. मा, युरोपियन कमिशनच्या 2019 च्या अहवालानुसार, अशा योजनांमुळे मनी लॉन्ड्रिंग, करचोरी आणि भ्रष्टाचाराचे धोके उद्भवू शकतात, ज्यामुळे पारदर्शक तपासणी महत्त्वाची आहे.