Mansa Devi Temple Stampede: हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Haridwar Mansa Devi Temple Stampede

Haridwar Mansa Devi Temple Stampede: उत्तराखंडच्या हरिद्वारमधील (Haridwar) प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात मोठ्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची (Mansa Devi Temple Stampede) घटना झाली आहे. या दुर्घटनेत किमान सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, 25पेक्षा अधिक भाविक जखमी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

मंदिराच्या पायऱ्यांच्या परिसरात एकाचवेळी मोठ्या संख्येने भाविक एकत्र झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि अचानक चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जाते. यामुळे काही भाविक खाली पडले

अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “मनसा देवी मंदिर परिसरात गर्दीच्या कारणामुळे ही घटना घडली आहे.

चेंगराचेंगरीची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव आणि मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, यामागील संभाव्य कारणांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मंदिराशेजारील एका खांबातून करंट येत असल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे लोक घाबरून पळू लागले, ज्यामुळे गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली. मात्र पोलिसांनी या दाव्यांना फेटाळून लावले असून, त्यासंदर्भात कोणतीही पुष्टी झालेली नाही.

राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले, “ही घटना अत्यंत दुःखद आहे. एसडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आहेत आणि मदतकार्य सुरू आहे. मी प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असून, सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो.”

Share:

More Posts