Jammu & Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने (rainfall)मोठा कहर केला असून जम्मूच्या रियासीत एका घरावर दरड कोसळून कुटुंबातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला. रामबन (Ramban) जिल्ह्यात ढगफुटीमुळे चौघांचा मृत्यू झाला आहे.
रियासी (Reasi) जिल्ह्याच्या माहौर तालुक्यातील बद्दर गावात झालेल्या जोरदार पावसामुळे डोंगरावर असलेल्या एका घरावर पहाटे दरड कोसळली. त्यात घरातील सर्व सातही सदस्यांचा मृत्यू झाला. पोलीस व बचाव दलाच्या जवानांनी मृतदेह ताब्यात घेतले. जिल्ह्याच्या प्रशासनाने डोंगराळ भागातील घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्याच्या राजगढ (Rajgarh)तालुक्यात ढगफुटी होऊन चार जणांचा मृत्यू झाला. या गावातील एक व्यक्ती बेपत्ता आहे. ढगफुटीमुळे या तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. एनडीआरएफ व राज्य आपत्ती दलाने बचाव कार्य सुरु केले. या क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे जम्मू कटरा ते उधमपूर (Jammu–Katra–Udhampur l)मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून येथील ४६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कठुआ ते उधमपूर मार्गावर अनेक ठिकाणी रुळ सरकले आहेत तर काही ठिकाणी रेल्वेमार्गाचे नुकसान झाले आहे. दरम्यान वैष्णोदेवी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या दुर्घटनेत ३४ भाविकांचा मृत्यू झाला होता तर २० हून अधिकजण जखमी झाले होते.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
बाप्पा पावला! गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय; दुधाच्या खरेदी दरात वाढ
शिंदेंकडून फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आंदोलकांना मदत ! खा. संजय राऊतांची टीका