ICAI CA September Exam 2025 | द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India) ने सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या सीए (CA Exams) अंतिम, इंटरमीडिएट आणि फाउंडेशन अभ्यासक्रमांसाठीचे अधिकृत वेळापत्रकजाहीर केले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया ICAI च्या सेल्फ-सर्व्हिस पोर्टलवर 5 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे.
परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्रक
अंतिम अभ्यासक्रमाच्या ग्रुप 1 च्या परीक्षा 3, 6 आणि 8 सप्टेंबरला, तर ग्रुप 2 च्या परीक्षा 10, 12 आणि 14 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहेत. इंटरमीडिएट ग्रुप 1 ची परीक्षा 4, 7 आणि 9 सप्टेंबरला, तर ग्रुप 2 ची परीक्षा 11, 13 आणि 15 सप्टेंबर रोजी घेतली जाईल. फाउंडेशन अभ्यासक्रमासाठी परीक्षा 16, 18, 20 आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.
फाउंडेशनमधील पेपर 3 आणि 4 हे प्रत्येकी दोन तासांचे असतील, तर अंतिम अभ्यासक्रमाचा पेपर 6 चार तासांचा असेल. इतर सर्व परीक्षा तीन तासांच्या असतील. पेपर 3 आणि 4 वगळता इतर सर्व पेपरसाठी दुपारी 1:45 ते 2:00 या वेळेत 15 मिनिटांचा आगाऊ वाचनाचा कालावधी दिला जाईल.
ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज ICAI च्या https://www.icai.org या अधिकृत संकेतस्थळावर 5 जुलै 2025 पासून भरता येतील. उमेदवार 18 जुलै 2025 पर्यंत कोणतेही विलंब शुल्क न भरता अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर, 21 जुलै 2025 पर्यंत ₹600 (परदेशी केंद्रांसाठी $10 USD) अतिरिक्त शुल्कासह अर्ज करता येईल.
22 जुलै ते 24 जुलै या कालावधीत परीक्षा केंद्र, माध्यम किंवा शहर बदलण्यासाठी सुधारणेची सुविधा उपलब्ध असेल. अर्ज भरण्यासाठी SRN (Student Registration Number) वापरून SSP पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.
वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी प्रक्रिया
- ICAI च्या वेबसाइटवर लॉग इन करा
- मुख्य पेजवरील’Important Announcements’ लिंकवर क्लिक करा
- ‘ICAI CA September Exam 2025 datesheet’ लिंक निवडा
- वेळापत्रक उघडा आणि ते डाउनलोड करा