आता बचत खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये, अन्यथा 500 रुपये भरावा लागणार दंड; ‘या’ बँकेने केला नवीन नियम

ICICI Bank Minimum Balance Rules

ICICI Bank Minimum Balance Rules: भारतातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असलेल्या ICICI बँकेने (ICICI Bank) आता बचत खात्यासाठी (Savings Account) मासिक किमान शिल्लक (ICICI Bank Minimum Balance Rules) ठेवण्याची मर्यादा वाढवली आहे.

आता आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना बँक खात्यात किमान 50 हजार रुपये शुल्क ठेवावे लागणार आहेत 1 ऑगस्टपासून हे नियम नवीन ग्राहकांना लागू होतील.

बँकेच्या नवीन नियमानुसार, मेट्रो आणि शहरी भागातील ज्या ग्राहकांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी किंवा त्यानंतर बचत खाते उघडले आहे, त्यांना आता दंडापासून वाचण्यासाठी दर महिन्याला खात्यात 50,000 रुपये किमान शिल्लक ठेवावी लागणार आहे. जुन्या ग्राहकांसाठी ही मर्यादा अजूनही 10,000 रुपये आहे.

नवीन ग्राहकांसाठी नवे नियम

  • निमशहरी भाग: येथे नवीन ग्राहकांना 25,000 रुपये किमान शिल्लक ठेवावी लागेल.
  • ग्रामीण भाग: येथील नवीन ग्राहकांना 10,000 रुपये किमान शिल्लक ठेवावी लागेल.
  • निमशहरी आणि ग्रामीण भागातील जुन्या ग्राहकांसाठी किमान शिल्लक मर्यादा 5,000 रुपये कायम आहे.

नियम न पाळल्यास दंड

जर ग्राहकाने किमान शिल्लक ठेवली नाही, तर त्याला 500 रुपये किंवा कमी असलेल्या रकमेच्या 6 टक्के, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढा दंड भरावा लागेल.

यासोबतच बँकेने काही इतर नियमही बदलले आहेत:

  • रोख रक्कम जमा करणे: आता महिन्याला तीन वेळा रोख रक्कम विनामूल्य जमा करता येईल. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये शुल्क आकारले जाईल. दर महिन्याची एकूण मर्यादा 1 लाख रुपये आहे.
  • रोख रक्कम काढणे: महिन्याला तीन वेळा विनामूल्य पैसे काढता येतील.
  • बचत खात्यावरील व्याजदर: एप्रिल 2025 पासून, 50 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी होऊन 2.75 टक्के झाला आहे.

ICICI बँकेने किमान शिल्लक वाढवण्याचा निर्णय इतर बँकांच्या धोरणांच्या अगदी उलट आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) 2020 मध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम रद्द केला होता. इतर अनेक मोठ्या बँकांमध्ये ही मर्यादा 2,000 ते 10,000 रुपये आहे.