चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा देण्याचा भारताचा निर्णय !

china tourist visa

नवी दिल्ली- भारताने (India ) या आठवड्यापासून चीनच्या नागरिकांना ( Chinese citizens) पुन्हा एकदा पर्यटक व्हिसा (visas )देण्यास सुरुवात केली आहे.भारताच्या या निर्णयाने भारत आणि चीनदरम्यान गेल्या काही वर्षांत तणावपूर्ण झालेल्या संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.तब्बल पाच वर्षांनंतर चीनच्या नागरिकांसाठी असलेला व्हिसा बंदीचा निर्णय मागे घेतला आहे.

भारत सरकारने २०२० मध्ये कोविड-१९ मुळे (COVID-19 pandemic)आणि त्याचदरम्यान लडाखमधील गलवान खोऱ्यातील चीनशी झालेल्या सैन्यसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी नागरिकांना दिल्या जाणार्‍या पर्यटन व्हिसावर बंदी घातली ( suspended all tourist visas )होती.मात्र आता चिनी नागरिकांना पुन्हा पर्यटन व्हिसा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे.

भारतीय दूतावासाने अधिकृत निवेदनात सांगितले की, चिनी नागरिक गुरुवारपासून पर्यटक व्हिसासाठी अर्ज करू शकतील.बीजिंग (Beijing),शांघाय आणि ग्वांगझू येथील भारतीय व्हिसा केंद्रांमध्ये अर्ज सादर करता येणार आहेत. अर्जप्रक्रियेबाबत आणि आवश्यक कागदपत्रांविषयी सविस्तर माहितीही अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे.भारताच्या या निर्णयाचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वागत केले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की,’हे एक सकारात्मक पाऊल आहे.सीमा ओलांडून प्रवास सुलभ करणे दोन्ही देशांच्या हिताचे आहे.एस.जयशंकर यांच्या चीन दौऱ्यानंतर निर्णय हा निर्णय भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांच्या चीन दौऱ्यानंतर घेण्यात आला आहे.