‘आक्रमण’ची तयारी! पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरू

Exercise Aakraman

Exercise Aakraman | जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) देशभरात संतापाची लाट उसळली आहे. नुकतीचे ‘आयएनएस सुरत’वर यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वीरित्या पार पडली. नौदलाच्या संरक्षण क्षमतेत ही एक मोठी उपलब्धी आहे.

‘आयएनएस सुरत’वर यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी पार पाडल्यानंतर आता दुसरीकडे, भारतीय हवाई दल (IAF) मध्यवर्ती क्षेत्रात ‘आक्रमण’ (Exercise Aakraman) नावाचा सराव करत आहे. यात राफेल (Rafale), सुखोई-30एमकेआय (Su-30MKI) यांसारख्या आघाडीच्या लढाऊ विमानांचा समावेश आहे.

हा सराव नियमित तयारीचा भाग असला तरी, पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच तो होत असल्याने लोकांचे आणि संरक्षण तज्ज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे.

दरम्यान, भारताने सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. भारतीय नौदलाच्या (Indian Navy) नवीनतम स्वदेशी बनावटीच्या INS सुरत या विनाशिकेने समुद्रातील लक्ष्यावर यशस्वी मारा केला आहे.

आयएनएस सुरत हे क्षेपणास्त्र हल्ल्याच्या स्थितीत शत्रूच्या क्षेपणास्त्रांची ओळख पटवून त्यांना हवेत किंवा पाण्यातच नष्ट करण्याची क्षमता ठेवते. यामुळे भारताची सागरी सीमा अधिक सुरक्षित झाली आहे. भारताच्या सीमेचा बराचसा भाग समुद्राला लागून असल्याने, ही उपलब्धी अधिक महत्त्वाची ठरते.

भारतीय नौदलाने INS सुरतच्या यशस्वी चाचणीचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, हा महत्त्वाचा टप्पा देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाची अटूट बांधिलकी आणि आत्मनिर्भर भारताप्रती समर्पण दर्शवतो. भारतीय नौदलाच्या सर्वात नवीन स्वदेशी बनावटीच्या INS सुरत या विनाशिकेने समुद्रातील लक्ष्यावर अचूकपणे यशस्वी मारा केला, जो आपल्या संरक्षण क्षमतांना अधिक बळकट करणारा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

INS सुरत ही भारतीय नौदलाची अत्यंत आधुनिक युद्धनौका आहे. या युद्धनौकेमुळे शत्रूंनी डागलेले क्षेपणास्त्र सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर हवेतच नष्ट करता येणार आहे. INS सुरत हे 15B वर्गाच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पातील चौथे अंतिम जहाज आहे. ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतेने सज्ज आहे.

Share:

More Posts