RailOne App | भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘RailOne’ नावाचे सुपर ॲप लाँच केले आहे. हे ‘वन-स्टॉप प्लॅटफॉर्म’ प्रवासाशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करेल.
तिकीट बुकिंग, ट्रेनची माहिती, कोचची स्थिती, तक्रार नोंदवणे आणि अभिप्राय देणे यासारख्या सुविधांचा समावेश या ॲपमध्ये आहे. RailOne ॲप प्रवाशांचा अनुभव सुलभ आणि आधुनिक बनवण्यासाठी डिझाइन केले आहे.
RailOne ॲपची वैशिष्ट्ये
- सोपा युझर इंटरफेस: RailOne ॲप यूजर्सला सुलभ इंटरफेससह उत्कृष्ट अनुभव देते.
- सर्व सेवा एकाच ठिकाणी: IRCTC आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटे, PNR आणि ट्रेनची स्थिती, कोच माहिती, रेल मदत तक्रार नोंदणी आणि प्रवास अभिप्राय एकाच ॲपवर.
- सिंगल-साईन-ऑन: एकच लॉगिनद्वारे सर्व सेवांमध्ये प्रवेश, अनेक पासवर्डची गरज नाही.
- कमी स्टोरेज: IRCTC Rail Connect, UTS, Rail Madad यांसारख्या वेगळ्या ॲप्सची गरज संपुष्टात, डिव्हाइस स्टोरेज कमी लागेल.
- R-वॉलेट आणि बायोमेट्रिक लॉगिन: R-वॉलेटद्वारे जलद पेमेंट, mPIN आणि बायोमेट्रिक लॉगिन पर्याय.
- सोपी नोंदणी: नवीन वापरकर्त्यांसाठी जलद नोंदणी आणि गेस्ट ॲक्सेससाठी OTP पडताळणी.
- उपलब्धता: हे ॲप अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि iOS ॲप स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.
सध्या भारतीय रेल्वेचे प्रवासी विविध सेवांसाठी अनेक वेगवेगळे ॲप्स आणि वेबसाइट्स वापरतात. तिकीट बुकिंगसाठी IRCTC Rail Connect, जेवण ऑर्डर करण्यासाठी IRCTC eCatering Food on Track, अभिप्राय देण्यासाठी Rail Madad, अनारक्षित तिकिटे खरेदी करण्यासाठी UTS आणि ट्रेनची स्थिती तपासण्यासाठी नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. मात्र, RailOne ॲपमध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतील.
रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठे बदल
भारतीय रेल्वे प्रवासी अनुभव सुधारण्यासाठी तिकीट बुकिंग आणि आरक्षण प्रणालीतही बदल करत आहे. यामध्ये खालील प्रमुख सुधारणा समाविष्ट आहेत:
अग्रिम चार्ट तयारी: चार्ट आता ट्रेन सुटण्यापूर्वी 8 तास आधी तयार होईल (सध्या 4 तास).दुपारी 14:00 वाजण्यापूर्वीच्या गाड्यांसाठी, मागील दिवशी रात्री 21:00 वाजता चार्ट अंतिम केला जाईल.
सत्यापित तत्काळ बुकिंग: 1 जुलैपासून फक्त आधार किंवा डिजी लॉकरद्वारे सत्यापित वापरकर्त्यांना तत्काळ बुकिंगची परवानगी देण्यात आली आहे. जुलै 2025 अखेरीस OTP व्हेरिफिकेशन लागू होईल.
प्रवाशांसाठी फायदे
RailOne ॲपमुळे प्रवाशांना एकाच ॲपवर सर्व सेवा मिळतील, ज्यामुळे वेळ आणि मेहनत वाचेल. सध्या IRCTC Rail Connect ॲपने 100 दशलक्ष डाउनलोड्सचा टप्पा ओलांडला आहे, आणि RailOne याच यशस्वी पायावर पुढे जात आहे. हे ॲप प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि एकत्रित सेवा देईल.