Home / देश-विदेश / IndiGo Airlines : तुर्कीची विमाने वापरण्यास इंडिगोला मार्चपर्यंतच मुदत

IndiGo Airlines : तुर्कीची विमाने वापरण्यास इंडिगोला मार्चपर्यंतच मुदत

IndiGo Airlines : ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor)भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या तुर्कीकडून (Turkey) भाडेतत्त्वावर घेतलेली विमाने परत करण्यासाठी इंडिगो कंपनीला केंद्र सरकारने...

By: Team Navakal
IndiGo Airlines
Social + WhatsApp CTA


IndiGo Airlines : ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor)भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या तुर्कीकडून (Turkey) भाडेतत्त्वावर घेतलेली विमाने परत करण्यासाठी इंडिगो कंपनीला केंद्र सरकारने मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती नागरी विमान उड्डयण मंत्रालयाने दिली आहे.

काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam)झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने (Indian Army)ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यावेळी तुर्कीने भारतविरोधी भूमिका घेतल्याने तुर्कीच्या सेलेबी (Celebi) या कंपनीवर भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली. भारतातील दिल्ली आणि मुंबईसह आठ विमानतळांवर सेलेबीला सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे.


दुसरीकडे इंडिगोच्या (IndiGo)ताफ्यात भाडेतत्त्वावर घेतलेली १५ विमाने आहेत. त्यापैकी ७ विमाने तुर्कीच्या कंपनीकडून घेतलेली आहेत. त्यातील दोन बोईंग ७७७ विमाने तुर्कीश एअरलाईन्सकडून (Turkish Airlines)तर पाच बी-७३७ विमाने तुर्कीच्या फ्रीबर्ज एअरलाईन्सकडून घेतलेली आहे. ही विमाने वापरण्यासाठी इंडिगोला अनुक्रमे २८ फेब्रुवारी २०२६ आणि ३१ मार्च २०२६ ही अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत इंडिगोला ही विमाने तुर्की कंपन्यांना परत करणे बंधनकारक आहे, अशी माहिती विमान उड्डयण मंत्रालयाने दिली.


हे देखील वाचा –

मुनगंटीवारांचा ‘खडसे पॅटर्न’? भाजपमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती?

महापालिका निवडणुकीत राजकीय गणितात धर्माचा खेळ? नवनीत राणाच ‘ते’ विधान चर्चेत

 जर तर ची गोष्ट’चे दिग्दर्शक रणजित पाटील काळाच्या पडद्याआड

Web Title:
संबंधित बातम्या