RSS Headquarters – भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरला ( Operation sindoor)प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या आयएसआयने (ISI)नागपुरच्या संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयावर हल्ला करण्याचा कट रचला असल्याची माहिती उघड झाली आहे. ऑपरेशन सिंदूर कारवाईत पाकिस्तानातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आले होते,असा दावा करत पाकिस्तानने ही हल्ल्याची योजना आखली आहे.
भारताच्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना (Indian central security agencies) मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने आपल्या प्रॉक्सी दहशतवादी गटांना भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयावर हल्ल्याचे आदेश दिले आहेत. नागपूर येथील आरएसएसचे मुख्यालय हे प्राथमिक लक्ष्य ठरवण्यात आले असून, त्यावर होणारा संभाव्य हल्ला हा “भारताच्या वैचारिक केंद्रावर प्रतिकात्मक आणि मानसिक धक्का देणारा ठरेल. गुप्तचर अहवालानुसार, नागपूर, मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणा येथील संघ कार्यालयांची जीपीएस लोकेशन्स, छायाचित्रे आणि कार्यवाही नकाशे गोळा करण्याचे आदेश आयएसआयने दिले आहेत. या कटामुळे दहशतवादी संघटनांचे संघटन सुरू झाले आहे. जैश-ए-मोहम्मद (aish-e-Mohammed), लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba)आणि अल-श्री कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट आदी गटांना आयएसआयने सक्रिय केले आहे.
या हल्ल्याच्या कटाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलिसांना मंदिर व गणेश मंडपांची तपासणी, गर्दीच्या बाजारपेठांवर नजर, स्वयंसेवकांची पडताळणी यांचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेशद्वारांवर कडक तपासणी आणि जलद प्रतिसाद पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. लालबागचा राजा आणि गिरगाव व जुहू चौपाटीवर विसर्जनासाठी येणार्या प्रमुख मंडळांना बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल स्क्वॉड, अतिरिक्त सीसीटीव्ही कव्हरेज आणि वॉच टॉवर उभारून प्रमुख मंडपांना विशेष सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
ज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबई पोलिसांना दिले 20 आश्वासनांचे हमीपत्र, जाणून घ्या काय आहेत अटी-शर्ती
15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे बेस्ट लॅपटॉप ; वाचा फीचर्स आणि किंमत