इराणसोबतच्या संघर्षादरम्यान इस्रायलने केली ‘ही’ मोठी चूक, भारतीयांनी नाराजी व्यक्त करताच मागितली माफी

Israel Iran Conflict

Israel Iran Conflict | इस्त्रायल आणि इराण या दोन मध्य पूर्वेतील देशांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. इस्त्रायलने इराणचा अणु कार्यक्रम नष्ट करण्यासाठी मोठे हल्ले केले होते. त्यानंतर आता इराणकडून देखील क्षेपणास्त्र डागत प्रत्युत्तर देतच आहे. या संघर्षादरम्यानच इस्त्रायने भारताचा चुकीचा नकाशा शेअर केल्याने टीका होता.

इस्रायली संरक्षण दलाने (Israeli Defence Forces) इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेवर आधारित एक नकाशा सोशल मीडियावर शेअर केला. या नकाशात जम्मू-काश्मीर भारताचा भाग न दाखवता पाकिस्तानचा आणि ईशान्य भारत नेपाळचा भाग म्हणून दाखवण्यात आले. या चुकीमुळे भारतीयांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर इस्रायली सैन्याने माफी मागितली. त्यांनी स्पष्ट केले की, हा नकाशा राष्ट्रीय सीमांचे चूक चित्रण करण्यासाठी नव्हता.

इस्रायल आणि इराणमधील वाढत्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा नकाशा शुक्रवारी X (ट्विटर) वर पोस्ट करण्यात आला. इस्रायली सैन्याने यात इराणला जागतिक धोका ठरवत म्हटले की, “इस्रायल हे अंतिम लक्ष्य नाही, ही फक्त सुरुवात आहे.” असे म्हणत नकाशात इराणच्या क्षेपणास्त्र कक्षेत भारतासह रशिया, युक्रेन, चीन आणि सुदान यांचा समावेश दाखवला होता.

मात्र, यामध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला. अनेक भारतीय यूजर्सने नाराजी व्यक्त केल्यानंतर इस्त्रायलच्या सैन्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे. हा नकाशा देशांची सीमा अचूक दाखवण्यासाठी नसल्याचे स्पष्ट करत माफी मागितली.

इस्रायल-इराण संघर्ष वाढला

दरम्यान, इस्रायलने इराणने मोठे हवाई हल्ले केलेय या हल्ल्यांचा उद्देश इराणचा अणु संवर्धन कार्यक्रम नष्ट करणे होता. या हल्ल्यांत इराणचे अनेक मोठे लष्करी कमांडर (Top Military Commanders) आणि 70 हून अधिक लोक मारले गेले. याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने तेल अवीव आणि जेरुसलेमसह इस्रायलच्या अनेक भागांवर ड्रोनआणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे.