इस्रायलचा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला! इराणचेही प्रत्युत्तर

Israel attacks Iran's Foreign Ministry! Iran retaliates

Israel attacks Iran’s Foreign Ministry! Iran retaliates


तेल अवीव – इस्राईल आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. काल इस्रायलने इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला केला.Israel attacks Iran’s Foreign Ministry या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. त्याच्या एक दिवस आधी इस्राईलने इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला केला होता. Iran retaliates इस्रायलच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्रायलच्या हायफा शहरातील तेल शुध्दीकरण प्रकल्पावर हल्ला केला.
इराणच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्राईलच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत २२४ लोकांचा बळी गेला आहे.तर १ हजार २२७ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या गटाने असा दावा केला आहे की, इराणमध्ये ४०६ लोकांचा इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये बळी गेला आहे.
इस्रायलने इराणविरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले आहे. या मोहिमेत इस्राईलने इराणवर सुमारे दोनशे लढाऊ विमानांच्या साह्याने हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये iran scientist killed इराणचे १४ शास्त्रज्ञ आणि २० हून अधिक लष्करी कमांडर मारले गेले आहेत.
इस्राईलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला प्रत्युत्तर म्हणून इराणने ट्रू प्रॉमीस थ्री ही लष्करी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून इराणने इस्राईलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यात इस्राईलच्या २० लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे.,काल इराणने इस्त्राईलच्या हायफा शहरातील तेल शुध्दीकरण प्रकल्पावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला.
इस्राईलने अणुकेंद्रांवर आणि लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युतरादाखल इराणने इस्राईलच्या हायफा शहरावर 200 क्षेपणास्त्रांचा मारा केला.इराणने केलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये किती जीवितहानी झाली याचा माहिती इस्राईलने अद्याप जाहीर केलेली नाही.