नोकरीच्या संधींमध्ये बदल! आयटी क्षेत्रात घट, पण ‘या’ क्षेत्रांमध्ये तेजी

AI-ML hiring

AI-ML hiring | सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर होताना दिसत आहे. यामुळे या क्षेत्रातील नोकरीची संधी देखील वाढल्या आहेत. मे 2025 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आणि मशीन लर्निंग (Machine Learning) क्षेत्रातील नोकरभरतीत 25% वाढ नोंदवली गेली आहे, तर एकूण माहिती तंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्रात नोकरीच्या संधींमध्ये घट झाली आहे.

‘नौकरी जॉबस्पीक मे 2025’अहवालात याबाबतची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयटी क्षेत्रातील नोकरभरतीत 5% घट झाली आहे.

Naukri चे मुख्य व्यवसाय अधिकारी पवन गोयल यांनी सांगितले की, एकंदरीत स्थिर असलेल्या नोकरीच्या बाजारपेठेत एआय/एमएल (AI/ML) क्षेत्रातील नोकरभरतीची गती कायम राहिली आहे. तसेच वरिष्ठ स्तरावरील व्यावसायिकांसाठी मागणी स्थिर राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.

नोकरीच्या संधी कमी होत असताना, रिअल इस्टेट आणि विमा क्षेत्रांत अनुक्रमे 5% आणि 6% वाढ झाली आहे, तर रिटेल, टेलिकॉम/आयएसपी आणि बँकिंग-फायनान्स क्षेत्रांत 8-9% घट झाली आहे.

बँकिंग आणि वित्तीय सेवांमधील युनिकॉर्न कंपन्यांनीनोकरभरतीमध्ये 29% वाढ नोंदवली आहे.

हैदराबाद आणि कोची येथे अनुक्रमे 7% आणि 8% नोकरभरती वाढ झाली, ज्याचे श्रेय वरिष्ठ स्तरावरील नोकरभरतीला दिले जात आहे. पुण्यातही एकूण नोकरभरतीमध्ये 4% वाढ झाली असून, स्टार्टअप्सनी (startups) 26% वाढ नोंदवली आहे.