Home / देश-विदेश / Jagdeep Dhankhar: धनखडांचा काँग्रेस काळातील आमदारकीच्या पेंशनसाठी अर्ज

Jagdeep Dhankhar: धनखडांचा काँग्रेस काळातील आमदारकीच्या पेंशनसाठी अर्ज

Jagdeep Dhankhar

Jagdeep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Former Vice President Jagdeep Dhankhar) यांनी सन १९९३ ते ९८ या पाच वर्षांच्या काँग्रेस (Congress) आमदारकीच्या पेन्शनसाठी (Pension) अर्ज केला आहे. राजस्थान सचिवालयाने (Rajasthan Secretariat) त्यांचा हा अर्ज स्वीकारला असून त्यांना आता आमदारकीची (MLA) पेंशन मिळणार आहे.आपल्या कारकीर्दीत उपराष्ट्रपती हे सर्वोच्च पद मिळवणाऱ्या धनखड यांनी आमदारकीच्या पेन्शनसाठी अर्ज का केला,असा प्रश्न त्यामुळे विचारला जाऊ लागला आहे.

जगदीप धनखड हे १९९३ ते १९९८ या काळात राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील किशनगढ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत.त्या आमदारकीच्या पेन्शनसाठी त्यांनी अर्ज केला आहे.


धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत तडकाफडकी उप राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला.मात्र त्यांनी खरोखरच प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला की अन्य काही कारणाने याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.त्यातच राजीनामा दिल्यापासून ते कधीही माध्यमासमोर किंवा सार्वजनिक कार्यक्रमात लोकांसमोर आलेले नाहीत. आता एक महिन्यानंतर या पेन्शनच्या अर्जामुळे ते चर्चेत आले आहेत.

धनखड हे १९८९ ते ९१ या काळात लोकसभा सदस्य होते. चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात ते संसदीय कामकाज मंत्री होते.१९९३ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला.ही आमदारकीची पाच वर्षे त्यांनी पूर्ण केली. पुढे २०१९ मध्ये त्यांची नियुक्ती पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी झाली. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांची निवड उपराष्ट्रपती म्हणून झाली. २१ जुलै २०२५ मध्ये त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात राजीनामा देणारे ते पहिले उपराष्ट्रपती ठरले.

वास्तविक उपराष्ट्रपतीपद सोडल्यानंतर निवृत्तीवेतन सुरु होते. मात्र धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवृत्तीवेतनाऐवजी काँग्रेसच्या आमदारकीच्या काळातील निवृत्तीवेतनासाठीच अर्ज का केला असा प्रश्न निर्माण झाला आहे.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

ट्रम्प कर बेकायदा ! पण अंमल सुरूच ! अमेरिकेन कोर्टाचा निर्णय

चेंगराचेंगरीतील बळींच्या कुटुंबियांना आरसीबीकडून २५ लाखांची मदत

जम्मू काश्मीरात पावसाचा कहर ! रियासीत ७ तर रामबनमध्ये ४ मृत्यू