Home / देश-विदेश / ऑपरेशन सिंदूरवेळी पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात बोलणे झाले होते का? एस जयशंकर म्हणाले…

ऑपरेशन सिंदूरवेळी पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात बोलणे झाले होते का? एस जयशंकर म्हणाले…

India Pakistan Conflict: सध्या लोकसभेत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) व पहलगाम हल्ल्याबाबत संसदेत चर्चा सुरू आहे. यादरम्यान, सरकारकडून विरोधी पक्षांच्या...

By: Team Navakal
India Pakistan Conflict

India Pakistan Conflict: सध्या लोकसभेत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) व पहलगाम हल्ल्याबाबत संसदेत चर्चा सुरू आहे. यादरम्यान, सरकारकडून विरोधी पक्षांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली जात आहेत. लोकसभेत बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Conflict) यांच्यातील संघर्षाच्या काळात अमेरिका आणि भारताच्या चर्चेत व्यापाराचा कोणताही संबंध नव्हता.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी वेळोवेळी केलेल्या दाव्यांना जयशंकर यांनी फेटाळून लावले. ट्रम्प यांनी दावा केला होता की, दोन्ही देशांना लढण्यापासून थांबवण्यासाठी त्यांनी व्यापाराचा वापर केला.

फोन कॉलचा उल्लेख

जयशंकर यांनी सांगितले की, 22 एप्रिल ते 17 जून (पहलगाम हल्ला ते भारत-पाकमधील शस्त्रसंधीचा कालावधी) या कालावधीत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोणताही फोन कॉल झाला नव्हता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान अमेरिकेशी झालेल्या चर्चेत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वान्स यांनी पंतप्रधानांना पाकिस्तानच्या हल्ल्याचा इशारा दिला होता. त्यावर मोदींनी भारताकडून तितकाच तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

जयशंकर यांनी सांगितले की, 9 आणि 10 मे रोजी भारताने पाकिस्तानकडून झालेल्या सततच्या हल्ल्यांना यशस्वीरित्या परतवून लावले. 10 मे रोजी अनेक देशांनी भारताशी संपर्क साधला आणि सांगितले की, पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार आहे. भारताने स्पष्ट केले की, शस्त्रसंधीच्या चर्चेसाठी फक्त अधिकृत वाहिनीद्वारे संपर्क झाला तरच त्याचा विचार केला जाईल.

शाहांचा हल्लाबोल

जयशंकरांचे वक्तव्य ऐकून विरोधी पक्षांनी निषेध केला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप करत विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, विरोधक आपल्या परराष्ट्र मंत्र्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या पक्षात परदेशी प्रभाव असला तरी संसदेत ते लादू शकत नाहीत. त्यांचे हे वक्तव्य ऐकून संसदेचे वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या

Share:

More Posts