Kailash Vijayvargiya Controversial Statement | भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. इंदूर येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुलींच्या कपड्यांवर केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांना मुलींच्या कपड्यांवर टीका करत म्हटले की, “मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या छोटे कपडे घालतात.”
त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी मंत्री विजयवर्गीय निशाणा साधला आहे.
रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशचे नगरविकास मंत्री कैलाश विजयवर्गीय एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “आपल्याकडे जर एखादी मुलगी चांगले कपडे घालते, दागिने (Jewelry) घालते, तर तिला सुंदर मानले जाते. पण परदेशात (Foreign Countries) जे कमी कपडे घालतात, त्यांना खूप चांगले मानतात. असे म्हणतात की, कमी कपडे घालणारी मुलगी ज्याप्रकारे सुंदर असते, त्याचप्रकारे कमी भाषण देणारा नेताही खूप चांगला असतो. अशी एक म्हण परदेशात आहे आणि आपल्याकडे मी त्याचे पालन करत नाही.”
VIDEO | Here is what MP Minister Kailash Vijayvargiya (@KailashOnline ) says on women who wear skimpy clothes: "I believe women should dress beautifully in Indian attire, as it is highly regarded in our culture. But, in some other countries, women who wear less clothes are often… pic.twitter.com/3FhKERsHNX
— Press Trust of India (@PTI_News) June 5, 2025
पण यासोबतच त्यांनी स्पष्ट केलं की, “मी तर हे मानतो की, आपल्याकडे महिला देवीचे स्वरूप असतात. खूप चांगले कपडे घालावेत आणि मला तर कमी कपडे घालणाऱ्या मुली आवडतच नाहीत. कधीकधी मुली माझ्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येतात. मी त्यांना म्हणतो, बेटा, पुढच्या वेळी चांगले कपडे घालून ये, मग आपण फोटो काढू.’ त्यांचे या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, विजयवर्गीय यांची महिलांबाबतची ही पहिलीच अशी टिप्पणी नाही. 2022 मध्ये इंदूरमध्ये हनुमान जयंतीच्या कार्यक्रमातही ते म्हणाले होते की, “आता काही मुली इतक्या अश्लील कपडे घालतात की त्या देवी नसून शूर्पणखांसारख्या दिसतात.” त्यानंतर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेत त्यांच्या माफीची मागणी केली होती.