Meta Apologies Karnataka CM Siddaramaiah | मेटाने (Meta) कंपनीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांची सोशल मीडिया पोस्टचे चुकीचे भाषांतर झाल्याबद्दल माफी मागितली आहे. चुकीच्या भाषांतरामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निधन झाल्याचे दाखवले गेले होते. यानंतर सिद्धरामय्या यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मेटाने या प्रकरणी माफी मागितली आहे.
नेमकी काय घडले?
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कन्नड भाषेत एका अभिनेत्रीच्या निधनाबद्दल शोक संदेश पोस्ट केला होता. ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांना श्रद्धांजली वाहणारी ही मूळ पोस्ट होती.
मात्र, जेव्हा या पोस्टचे इंग्रजीमध्ये स्वयंचलित भाषांतर झाले, तेव्हा त्यात चुकून असे लिहिले गेले की, “सिद्धरामय्या यांचे निधन झाले आहे.” या गंभीर चुकीमुळे तात्पुरता गोंधळ निर्माण झाला. अनेकांनी सिद्धरामय्या यांना फोन देखील केले.
मुख्यमंत्र्यांची नाराजी आणि मेटाची माफी
या चुकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मेटाच्या कन्नड स्वयंचलित भाषांतर फिचरवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी या फिचरवर “वस्तुस्थिती विकृत करणे” आणि “यूजर्सची दिशाभूल करणे” असा आरोप केला. अधिकृत मेसेजबाबत संदर्भात अशा चुकीच्या भाषांतरांना विशेषतः धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले.
सिद्धरामय्या यांचे माध्यम सल्लागार के. व्ही. प्रभाकर यांनी मेटाला पत्र लिहून हे भाषांतर दुरुस्त करण्याची आणि त्याची अचूकता सुधारेपर्यंत कन्नड स्वयंचलित भाषांतर तात्पुरते निलंबित करण्याची विनंती केली होते. अशा चुका टाळण्यासाठी कन्नड भाषा तज्ज्ञांसोबत काम करण्याचे आवाहनही त्यांनी कंपनीला केले.
मेटाच्या प्रवक्त्याने या प्रकरणावर बोलताना सांगितले की, “आम्ही या चुकीच्या कन्नड भाषांतरामुळे उद्भवलेली समस्या तात्पुरती दुरुस्त केली आहे.” “हे घडल्याबद्दल आम्ही माफी मागतो.” दरम्यान, या प्रकरणानंतर सिद्धरामय्यांच्या मूळ पोस्टमधील चूक दुरस्त करण्यात आली.
हे देखील वाचा –