Dharmasthala Mass Burial: धक्कादायक! 100 हून अधिक मृतदेह पुरल्याचा दावा, आता कर्नाटक सरकारने स्थापन केले विशेष तपास पथक

Dharmasthala Mass Burial

Dharmasthala Mass Burial: कर्नाटकतील धर्मस्थळ (Dharmasthala Mass Burial) परिसरातील मागील दोन दशकांतील कथित सामूहिक मृतदेह दफन, बेपत्ता झालेल्या महिला आणि विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (Dharmasthala SIT) स्थापन केलं आहे.

कर्नाटक गृह विभागाने याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला. या आदेशानुसार धर्मस्थळ पोलीस ठाण्याने नोंदवलेले गुन्हे तसेच इतर जिल्ह्यांतील संबंधित गुन्हे आता SITच्या कक्षेत आले आहेत.

धर्मस्थळ हे कर्नाटकच्या दक्षिण कन्नडजिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रआहे. या ठिकाणी केवळ सामान्य भाविकच नव्हे, तर अनेक मोठे राजकारणी, सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूही भेट देतात. अशा पवित्र आणि महत्त्वाच्या ठिकाणी अशा गंभीर आरोपांमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

महिलांवरील गुन्हे, बेपत्ता प्रकरणांमध्ये मोठा तपास सुरू

कर्नाटक राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी करताना स्पष्ट केलं होतं की, गेल्या 20 वर्षांमध्ये धर्मस्थळ परिसरात अनेक महिला आणि विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर अनैसर्गिक मृत्यू, खून, बलात्काराच्या अनेक तक्रारी देखील समोर आल्या आहेत.

या मागणीला आधार देत आयोगाने 14 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, ज्यात 1मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देण्यात आला. या रिपोर्टमध्ये एका रोजंदारी कामगाराने दावा केला की त्याने धर्मस्थळाजवळ 100 हून अधिक मृतदेह पुरले आहेत. सुरक्षा कारणास्तव या साक्षीदाराची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

SITमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश

कर्नाटक पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि नेत्रावती नदीजवळ शवविच्छेदनासाठी शोध मोहीम सुरू करण्याचे ठरवले होते. याच तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या SIT चे नेतृत्व पोलीस महासंचालक (DGP) प्रणव मोहंती हे करणार आहेत.

या पथकात पोलीस उपमहानिरीक्षक एम.एन. अनुचेथ, उपायुक्त सौम्यलता आणि पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार दयामा यांचा समावेश आहे. या पथकाला आवश्यक त्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची साथ मिळणार आहे.

सरकारच्या आदेशानुसार, या प्रकरणातील सर्व फौजदारी खटले SIT कडे वर्ग करण्यात येणार आहेतते आपल्या तपासाचा अहवाल पोलिस महासंचालक व शासनाकडे नियमितपणे सादर करणार आहे.

हे देखील वाचा –

Pravin Darekar: क्षमतेपेक्षा जास्त लोकं आत घुसले, प्रवीण दरेकरांसह 17 जण 20 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले

सभागृहात जंगली रमीचा डावमंत्री कोकाटेंवर विरोधकांची टीका

Tax Free Countries: पूर्ण पगार तुमचाच! जगातील ‘हे’ आहेत असे देश जिथे भरावा लागत नाही कर