Kashish Chaudhary | बलुचिस्तानच्या पहिल्या हिंदू सहाय्यक आयुक्त कशिश चौधरी कोण आहेत?

Kashish Chaudhary |

Kashish Chaudhary | बलुचिस्तान (Balochistan) या पाकिस्तानमधील अशांत प्रांतात एका 25 वर्षीय पाकिस्तानी हिंदू महिलेने इतिहास रचला आहे. कशिश चौधरी (Kashish Chaudhary) असे या महिलेचे नाव असून, त्या प्रांतातील अल्पसंख्याक समुदायातील पहिल्या महिला आहेत, ज्यांची सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner) म्हणून नियुक्ती झाली आहे.

बलुचिस्तान लोकसेवा आयोगाचीपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कशिश यांनी हे पद मिळवले. कशिश आणि त्यांचे वडील गिरधारी लाल यांनी क्वेट्टा येथे बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी महिलांच्या प्रगतीसाठी काम करणे, अल्पसंख्याक समुदायांना पाठिंबा देणे आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात मदत करणे हे आपले ध्येय असल्याचे सांगितले.

“माझ्या मुलीने आपल्या कठोर परिश्रम आणि निष्ठावान प्रयत्नांमुळे सहाय्यक आयुक्त पद मिळवले आहे, याचा मला खूप अभिमान आहे,” असे लाल यांनी पत्रकारांना सांगितले. मध्यमवर्गीय व्यापारी असलेले लाल म्हणाले की, त्यांच्या मुलीला नेहमीच शिक्षण घ्यायचे होते आणि महिलांच्या जीवनात बदल घडवायचा होता.

मुख्यमंत्री बुगती म्हणाले की, जेव्हा अल्पसंख्याक समुदायातील लोक समर्पण आणि प्रयत्नांमुळे अशा पदांवर पोहोचतात, तेव्हा तो देशासाठी अभिमानाचा क्षण असतो. “कशिश ही देशासाठी आणि बलुचिस्तानसाठी अभिमानाचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले.

‘समा टीव्ही’शी बोलताना कशिश यांनी सांगितले की, या तयारीसाठी त्यांना 3 वर्षे लागली आणि दररोज किमान 8 तास अभ्यास केला. “शिस्त, कठोर परिश्रम आणि समाजासाठी योगदान देण्याची इच्छा यांनी मला या संपूर्ण प्रवासात प्रेरित केले,” असे त्या म्हणाल्या.

अल्पसंख्याक समुदायाचा वाढता भाग

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या व्यवसायात ठसा उमटवणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदांवर पोहोचण्यासाठी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अडथळे पार करणाऱ्या पाकिस्तानातील अनेक हिंदू महिलांमध्ये कशिश यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.

अलिकडच्या वर्षांत, हिंदू समुदायातील अधिक महिलांनी अशा भूमिकांमध्ये प्रवेश केला आहे, ज्या कधीकाळी त्यांच्यासाठी आवाक्याबाहेरच्या मानल्या जात होत्या. जुलै 2022 मध्ये मनीषा रोपेटा कराचीच्या पहिल्या हिंदू महिला पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) बनल्या आणि त्या अजूनही कार्यरत आहेत.

सुमन पवन बोडानी 2019 मध्ये सिंध प्रांतातील आपल्या मूळ गावी शाहदादकोट येथे प्रथम नियुक्त झाल्यापासून पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये दिवाणी न्यायाधीश (Civil Judge) म्हणून कार्यरत आहेत.

सिंधमध्ये अल्पवयीन आणि तरुण हिंदू मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतरण यांसारख्या समस्या दिसून येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हिंदू समुदायासाठी शिक्षण सुविधा सुधारल्यास या समस्यांवर मात करण्यास मदत मिळू शकते, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानमधील हिंदू सर्वात मोठा अल्पसंख्याक गट आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सुमारे 7.5 लाख हिंदू देशात राहतात. तथापि, समुदायाच्या अंदाजानुसार ही संख्या 9.0 लाखांपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानच्या बहुतेक हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात राहते.