Kim Fingerprint Erased China : उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन (North Korean dictator Kim Jong) यांनी नुकतीच चीनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांच्याशी भेट घेतली. ही भेट राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाची ठरली. परंतु त्यानंतर किम जोंग यांनी या भेटीवेळी वापरलेला ग्लास, खुर्ची आणि टेबल त्यांच्या अंगरक्षकांनी तत्काळ ताब्यात घेऊन त्यावरील सगळे जैविक पुरावे पुसून (Kim Fingerprint Erased China) टाकले.
दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर त्या ठिकाणी जोंग यांचे कुठलेही जैविक (DNA) ठसे मागे राहू नयेत याची विशेष काळजी घेण्यात आली. यासाठी खुर्च्या, टेबल आणि परिसर यांची अत्यंत बारकाईने सफाई करण्यात आली. तज्ज्ञांच्या मते ही पद्धत परदेशी गुप्तचर संस्थांकडून आरोग्यविषयक माहिती गोळा होऊ नये यासाठी असते. कोणत्याही नेत्याच्या बोटांचे ठसे, थुंकी, मूत्र अथवा विष्ठेमधून त्यांच्या आरोग्याची, औषधोपचारांची किंवा आनुवंशिक माहिती मिळू शकते. ही माहिती शत्रू देशांच्या हाती लागली तर राजकीय डावपेचांमध्ये तिचा गैरवापर होऊ शकतो.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याही परदेश दौऱ्यांदरम्यान त्यांचे अंगरक्षक एक विशेष सुटकेस बरोबर नेत असतात. या सुटकेसमध्ये पुतीन यांचे मूत्र आणि विष्ठा गोळा केली जाते. जेणेकरून कोणतीही बाह्य गुप्तचर संस्था त्यांचे जैविक नमुने मिळवू शकणार नाही.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
भाजपा प्रवेशासाठी गाडी सजलीपण खेडेकरांचा प्रवेश लटकला
बेटिंग अॅप प्रकरणात क्रिकेटर धवनची ईडीकडून चौकशी
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ योजनेंतर्गत आता लाभार्थ्यांना देणार 2500 रुपये