Home / देश-विदेश / भोपाळ | कुनोच्या चित्त्यांना खाद्य, हेलिकॉप्टरने चिंकारा आणणार

भोपाळ | कुनोच्या चित्त्यांना खाद्य, हेलिकॉप्टरने चिंकारा आणणार

भोपाळ – कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्यांना खाद्य पुरवण्यासाठी शाजापूर मधून हेलिकॉप्टर द्वारे चिंकारे आणण्यात येणार आहेत. त्यासाठी रॉबीनसन्स हे हेलिकॉप्टर...

By: Team Navakal
Kuno National Park
Social + WhatsApp CTA

भोपाळ – कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्यांना खाद्य पुरवण्यासाठी शाजापूर मधून हेलिकॉप्टर द्वारे चिंकारे आणण्यात येणार आहेत. त्यासाठी रॉबीनसन्स हे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले असून गरज लागल्यास काही प्राणी गांधीनगर प्राणीसंग्रहालयातून आणण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशच्या वनविभागाने ही माहिती दिली आहे.

हवाई वाहतूक विभागाने रॉबीनसन्स हे एक इंजिन असलेले हेलिकॉप्टर उपलब्ध करुन दिले असून वन विभागाने ते दहा दिवसांसाठी भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहिम सुरु करण्याची तारीख निश्चित नसली तरी येत्या ऑक्टोबर पासून ही मोहिम सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शाजापूरमध्ये चिंकाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून त्याचा त्रास स्थानिक शेतकऱ्यांना होत आहे.

हे चिंकारे शेतात घुसून शेती उद्धवस्त करत असतात. त्यांचा त्रास कमी करुन तिकडे चित्यांना भक्ष्य पुरवण्यात येणार आहे. या आधीही वनविभागाने हेलिकॉप्टरने चिंकारा आणण्याची योजना तयार केली होती मात्र त्यावेळी त्यांच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता हवाई वाहतूक विभागाच्या सहकार्यामुळे ही मोहिम राबवणे शक्य झाले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या