L&T Chairman S N Subrahmanyan: या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्या प्रचंड टीका झाली होती. त्यानंतर आता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कामाच्या दिरंगाईमुळे ग्राहक नाराज होते, त्यामुळे त्यांनी हे विधान सामान्य संवादादरम्यान केले होते.
L&T चे काम वेळेवर पूर्ण होत नसल्याने काही मोठ्या ग्राहकांनी सुब्रह्मण्यन यांना वैयक्तिकरित्या फोन आणि ई-मेल करून नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल बोलताना सुब्रह्मण्यन म्हणाले, “माझ्या मनात अनेक गंभीर प्रश्न होते. कामासाठी पुरेसे कर्मचारी मिळत नव्हते आणि त्यामुळे काम योग्य वेगाने होत नव्हते. इतक्या मोठ्या स्तरावर कामाबद्दलची तक्रार येणे, माझ्यासाठी किंवा कंपनीसाठी चांगले नाही.”
‘माझे बोलणे सहज होते’
सुब्रह्मण्यन यांनी सांगितले की, एका कर्मचाऱ्याने प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे उत्तर सहजपणे दिले. मात्र, त्या संभाषणाचे रेकॉर्डिंग नियमांच्या विरुद्ध होते. ते म्हणाले, “मी हे बोलणे सहजपणे बोललो होतो, कारण माझी बोलण्याची पद्धतच अशी आहे. पण मी कबूल करतो की मी वेगळ्या पद्धतीने बोलू शकलो असतो. माझ्या पत्नीलाही हे ऐकून वाईट वाटले, कारण त्यात तिचे नावही आले होते.” या घटनेचा त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला असल्याचेही त्यांनी मान्य केले.
ते पुढे म्हणाले, “मी हे वक्तव्य मागे घेऊ शकत नाही. जर भविष्यात असाच प्रश्न आला, तर कदाचित मी वेगळ्या पद्धतीने उत्तर देईन. तेव्हाची परिस्थिती वाईट होती कारण कंपनीच्या कामगिरीवर परिणाम होत होता.”
दरम्यान, गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या L&T च्या वार्षिक अहवालानुसार, 2025 या आर्थिक वर्षात सुब्रह्मण्यन यांच्या वेतनात जवळपास 50% वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या 51.05 कोटींच्या तुलनेत ते आता 76.25 कोटी रुपये झाले आहे.
हे देखील वाचा –
अंतराळातून परतल्यानंतर शुभांशु शुक्ला यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिली ‘ही’ खास भेटवस्तू
इतिहास परतला! सरदार रघुजी भोसले यांची 18 व्या शतकातील तलवार लंडनहून महाराष्ट्रात दाखल