Home / देश-विदेश / Malegaon bomb blast : मालेगाव बॉम्बस्फोट निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

Malegaon bomb blast : मालेगाव बॉम्बस्फोट निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

Malegaon bomb blast – मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (adhvi Pragya Singh Thakur)आणि कर्नल प्रसाद पुरोहित...

By: Team Navakal
Bombay high court


Malegaon bomb blast – मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (adhvi Pragya Singh Thakur)आणि कर्नल प्रसाद पुरोहित ( Lt Col Prasad Purohit, )यांच्यासह सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या विशेष एनआयए न्यायालयाच्या निर्णयाला बॉम्बस्फोटात बळी गेलेल्या सहा जणांच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay high court)आव्हान दिले आहे.


२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील एका मशि‍दीच्या बाहेर उभ्या करण्यात आलेल्या मोटरसायकलवरील बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात ६ जण ठार झाले. तर १०१ जण जखमी झाले. या प्रकरणी तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-Terror Squad ) सुरुवातील ११ जणांना अटक केली होती.मात्र पुढे त्यापैकी चार संशयितांना खटल्यातून वगळण्यात आले आणि साध्वी प्रज्ञा सिंह आणि पुरोहित यांच्यासह उर्वरित ७ आरोपींवर खटला चालविण्यात आला. या खटल्याचा निकाल विशेष एनआयए न्यायालयाने या वर्षी ३१ जुलै रोजी दिला.न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.


विशेष एनआयए (National Investigation Agency)न्यायालयाच्या या निकालाला बळींच्या कुटुंबियांनी अॅड मतीन शेख यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.हा निकाल अत्यंत चुकीचा आणि अन्यायकारक आहे.पोलिसांच्या तपासातील ढिसाळपणा आणि न्यायालयीन प्रक्रियेतील त्रुटी हा दहशतवादी कृत्यातील आरोपींना निर्दोष ठरविण्याचा आधार असू शकत नाही,असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे. न्या. अजय गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.


हे देखील वाचा

राजस्थान रॉयल्सच्या सीईओंचाही राजीनामा

संतोष देशमुख प्रकरणी आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद पूर्ण

पंजाबमधील दोन हजार गावे अजूनही पुराच्या विळख्यात

Web Title:
संबंधित बातम्या