Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पुन्हा एकदा सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचे म्हटले आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित “100 वर्षांचा संघाचा प्रवास: नवीन क्षितीज” या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंदु संस्कृती, परंपरा याविषयी भाष्य केले.
आपले पूर्वज, परंपरा आणि संस्कृती यामुळे अखंड भारतातील लोक अनेक वर्षांपासून जोडले गेले आहेत, असे म्हटले आहे. 40,000 वर्षांपासून या उपखंडात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा डीएनए (DNA) मूलतः समान आहे, असे मोठे विधान त्यांनी केले.
‘हिंदू’ ही संकल्पना भौगोलिक
यावेळी मोहन भागवत यांनी ‘हिंदू’ या शब्दाची व्याख्या फक्त धार्मिक नाही, तर भौगोलिक, वारसा आणि समान सांस्कृतिक परंपरेशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले. काही लोक स्वतःला हिंदू मानतात, तर काहींना अजून याची जाणीव नाही. आपली ओळख केवळ भूमीशी जोडलेली नसून, ‘भारत माता’ आणि पूर्वजांच्या चिरस्थायी परंपरांप्रती असलेल्या श्रद्धेवर आधारित आहे, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, “आपला डीएनए समान आहे… सलोख्याने राहणे ही आपली संस्कृती आहे.”
" Who is a Hindu ?" explains Dr. Mohan ji Bhagwat. #संघयात्रा pic.twitter.com/wJK3YUc0JE
— RSS (@RSSorg) August 26, 2025
भारत अजूनही योग्य जागतिक स्थान मिळवू शकला नाही
स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांत भारताला जागतिक स्तरावर योग्य स्थान मिळालेले नाही, असेही भागवत यांनी म्हटले. ‘विश्वगुरू’ म्हणून भारताला जगाचे मार्गदर्शन करायचे आहे, आणि ती वेळ आता आली आहे.यासाठी समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
“जर आपल्याला देशाला प्रगती करायची असेल, तर ते काम कुणीतरी करेल असे सोडून चालणार नाही. प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडायला हवी. सरकार आणि राजकीय पक्ष मदत करतील, पण समाजातील परिवर्तनातूनच खरी प्रगती होईल,” असे ते म्हणाले.
‘हिंदू’ ही संज्ञा बाहेरच्या लोकांनी दिली
मोहन भागवत यांनी ‘हिंदू’ या शब्दाचा उगमही सांगितला. ते म्हणाले की, हा शब्द बाहेरच्या लोकांनी या भूमीवर राहणाऱ्या लोकांसाठी वापरला. हिंदू म्हणजे संघर्ष नाही, तर इतरांचा आदर करून स्वतःच्या मार्गावर चालण्याची तयारी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हा तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा भाग आहे, ज्यामध्ये मोहन भागवत समाजातील विविध प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद साधणार आहेत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
१ सप्टेंबरपासून सांगली महापालिकेचे कामकाज ऑनलाइन